खाकी वर्दीतील अष्टपैलू व दिलदार व्यक्तिमत्व असलेले ………सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे सेवानिवृत्त …… अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अनावर……. पोलीस आयुक्त देखील गहिवरले….!

शहर पोलीस आयुक्तालयातून 33 पोलीस अधिकारी व अंमलदार निवृत्त..!

लाल दिवा : महाराष्ट्र पोलीस दलाची शान वाढविणाऱ्या व पोलीस उपनिरीक्षक ते सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून धडाडीची कामगिरी करणाऱ्या डॉ. सीताराम कोल्हे यांचा आजपर्यंतचा प्रवास अतिशय थरारक आहे. खडतर परिस्थितीत त्यांनी यशाला गवसणी घातलेली आहे. राष्ट्रपतीपदक विजेत्या या अधिकाऱ्याकडे शिक्षण घेत असताना परीक्षेसाठी पैसे नव्हते तरीही त्यांनी संघर्षमय जीवनाचा प्रवास करीत आपले ध्येय गाठले पोलीस दलातील मार्गदर्शक ठरणारे डॉ. सीताराम कोल्हे आज सेवानिवृत्त होत आहेत अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या जीवनकार्याचा हा थोडक्यात परिचय.

 

नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातून 33 पोलीस अधिकारी व अंमलदार आणि एक स्विय सहाय्यक (स्टेनो) सेवानिवृत्त झाले. सदर सेवानिवृत्त कार्यक्रम प्रसंगी, माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर तसेच पोलीस उपायुक्त परिमंडळ 1, श्री किरणकुमार चव्हाण , पोलीस उप आयुक्त परिमंडळ 2 श्रीमती मोनिका राऊत मॅडम, पोलीस उपायुक्त मुख्यालय श्री चंद्रकांत खांडवी तसेच शहरातील सर्व सहाय्यक पोलीस आयुक्त पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व सेवानिवृत्त अधिकारी अंमलदार नातेवाईकांसह मोठ्या संख्येने भीष्मराज हॉल या ठिकाणी उपस्थित होते. सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदार यांचा माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांनी गुणगौरव करून , त्यांचे कुटुंबीयांचा यथोचित सत्कार केला. सेवा निवृत्त अधिकारी अंमलदार याना व कुटुंबीयांना भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.

 

शासकीय नोकरी असो की खासगी कोणत्याही व्यक्तीला आपले कार्य तथा कामकाज करीत असताना एक दिवस सेवानिवृत्त व्हावे लागते. सुमारे तीन-साडेतीन दशकांच्या वाटचालीत अनेक चांगल्या वाईट प्रसंगांना तोंड द्यावे लागते. जीवनात सुखदुःखाचे क्षण येतात परंतु कर्तव्य महत्त्वाचे मानावे लागते. पोलीस दलात काम करताना तर कर्तव्य किंवा सेवा याला प्राधान्य देणे हाच अग्रक्रम असतो; पोलीस अधिकाऱ्याची नोकरी म्हणजे जणू काही तारेवरची कसरत होय. २४ तास सेवेसाठी तत्पर राहणे हाच जणू काही मूलमंत्र आणि ध्येय मानावे लागते. अशाच या ध्येयवादी असलेल्या सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे यांच्या जीवनातही अनेक खडतर प्रसंग आले; मात्र त्यांनी त्या प्रसंगाला अत्यंत धैर्याने तोंड दिले. आज पोलीस दलातून ते सेवानिवृत्त होत आहेत; मात्र शासकीय सेवेतून निवृत्त झाले, तरी त्यांचे सेवाभावी कार्य हे यापुढे असेच सुरू राहणार आहे, यात शंकाच नाही. निरोप देताना भावनिक होण साहजिकच आहे. शेवटी गुरू शिक्षक आई-वडील. परंतु जीवनाची संपूर्ण लढाई स्वतःलाच लढायची असते. कष्टाला पर्याय नाही, संघर्ष हेच जीवन आहे, असे मत डॉ. सीताराम कोल्हे यांनी एका निरोप समारंभाच्या प्रसंगी व्यक्त केले होते. त्यांचे हे अनुभवाचे बोल निश्चितच प्रेरणादायी आहेत.

खरे तर आयुष्यात आर्थिक परिस्थितीचा बाऊ न करता यशाचे कोणतही शिखर गाठण्यासाठी आपल्या मनात जिद्द आणि चिकाटी जर असेल ना, तर खडतर परिस्थितीतही आपण सहज यश प्राप्त करू शकतो. पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रपती पदकाने सन्मानित झालेले डॉ. सीताराम कोल्हे यांनी दाखवून दिले आहे. आपल्या कुशल कामगिरीने महाराष्ट्र पोलीस दलाची शान वाढविणाऱ्या डॉ. सीताराम कोल्हे यांचा आजपर्यंतचा प्रवास अतिशय थरारक आहे. खडतर परिस्थितीत त्यांनी यशाला गवसणी घातलेली आहे. अहिल्यानगर (पूर्वीचे अहमदनगर) या जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील लोणी हवेली हे त्यांचे मूळगाव आई, वडील आणि चार भाऊ असे त्यांचे कुटुंब, आर्थिक परिस्थिती तशी साधारणच होती; मात्र आपल्या मुलाने शिकून मोठे व्हावे अशी त्यांच्या आई वडिलांची इच्छा होती. सीताराम यांना ही लहानपणापासून शाळेची आवड होती. त्यांचे प्राथमिक शिक्षण पहिली ते सातवी हे मूळगावी लोणी हवेली येथेच झाले. पुढील आठवी ते दहावी शिक्षण त्यांनी पारनेर येथे घेतले; मात्र तेव्हा वाहनांची व्यवस्था नसल्यामुळे गाव ते पारनेर असे सुमारे १२ किलोमीटरचे अंतर ते दररोज पायी ये-जा करत होते.

 

विद्यार्थीदशेत सीताराम कोल्हे यांना आर्थिक परिस्थितीची जाणीव होती तसेच त्याकाळी शिक्षणाच्या फारशा साधन सुविधा नव्हत्या त्यामुळे उपलब्ध परिस्थितीतच सर्वसामान्य कुटुंबातील मुले शिक्षण पुढे जात असत. आपल्या शिक्षणासाठी आई वडिलांची मेहनत बघता ते चांगले अभ्यास करीत होते. पुढे जाऊन दहावीच्या बोर्डात चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर आई वडिलांसह गावातील नागरिकांना खूप आनंद झाला. त्यांनी आनंदाच्या भरात बैलगाडीवरून सीताराम यांची मिरवणूक काढली आणि हाच क्षण त्यांच्यासाठी लाख मोलाचा ठरला आणि अजून मेहनत करून काही तरी करून दाखवण्याची जिद्द त्यांच्या मनात पक्की झाली. पुढे अहमदनगरमध्ये जाऊन अधिक जोमाने पुढील अभ्यास सुरू केला.

 

वास्तविक पाहता सुमारे ३०- ३५ वर्षांपूर्वी महाराष्ट्रात विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच एमपीएससीच्या परीक्षा देत होते; मात्र त्या काळात फारसे चांगले क्लासेस उपलब्ध नव्हते. शाळा कॉलेजमध्येही यासंदर्भात मोलाचे मार्गदर्शन करणारे कोणी नसत. शैक्षणिक साहित्यही पुरेशा प्रमाणात नव्हते; मात्र अशाही परिस्थितीत काही विद्यार्थी त्यावर मात करीत पुढे जात होते, सीताराम कोल्हे हे देखील अशाच एका ध्येयाने झपाटले होते. पुण्यात एम. एस्सीचे शिक्षण घेत असताना पोलीस दलाविषयी अधिक माहिती मिळाली व आपण ही पोलीस दलात चांगल्या पदावर भरती व्हायचे म्हणून विचार सुरू केला. त्याचवेळी

प्रेरणा मिळाली व दिवसरात्र एक करून अभ्यास केला. कितीही कठीण परिस्थिती आली तरी त्यावर मात करीत पुढे कोल्हे यांनी त्यांच्या संघर्षमय जीवनातील एक प्रसंग सांगितला आहे. डॉ. कोल्हे म्हणतात, की परीक्षेसाठी अहमदनगरहून पुण्याला जायचे होते; मात्र आर्थिक परिस्थिती इतकी खडतर होती, की भाडचासाठी पैसे नव्हते. मित्रांकडून इकडून तिकडून २०० रुपये जमा केले; मात्र ते ही खर्च होऊन गेले. मग अशा वेळी करायचे काय ? तर अहमदनगरहून पुण्याला एक कांद्याची भरलेली गाडी जात होती. अक्षरशः त्या गाडीत कसबस बसून मी पुणे गाठले आणि परीक्षा दिली. असे अनेक कठीण प्रसंग माझ्या जीवनात अनुभवले आहेत, असे डॉ. सीताराम कोल्हे सांगतात. असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व डॉ. कोल्हे यांना विविध शास्त्रीय, आध्यात्मिक, कायद्याची व मानसशाखाची पुस्तके वाचनासोबत संगीताची देखील आवड आहे. दैनंदिन जीवनात मानसशास्त्राच्या ज्ञानाचाही कायमच सामाजिक सलोख्यासाठी उपयोग करतात. त्यांनी बी. एस्सी. (फिजिक्स), एम. एस्सी. (मॅथ्स), एम. ए. (सायकॉलॉजी), एमबीए (एचआर), पीएच. डी. (क्रिमिनल सायकॉलॉजी) अशा पदव्या मिळविल्या आहेत, तसेच संगीत क्षेत्रात ही त्यांना आवड असून, तबलावादनात त्यांनी पदवी मिळविली आहे. दरम्यान, सन १९९२ मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून महाराष्ट्र पोलीस दलात नियुक्ती झाली. यावेळी लोणी हवेली गावातून प्रथमच पोलीस अधिकारी म्हणून जॉईन झाल्यामुळे सर्वच नागरिकांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. डॉ. सीताराम कोल्हे यांनी अतिशय चांगले काम केले आहे. नॅशनल व इंटरनॅशनल जर्नल्समध्ये १४ रिसर्च पेपर प्रकाशित केले आहेत. दोन वर्षे सातत्याने दक्षता मासिकातून लिखाण केले आहे. विद्यार्थी व पोलीस दलातील नवीन अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी मार्गदर्शनपर व्याख्यान दिली आहेत. डॉ सिताराम कोल्हे यांनी अमरावती, नागपूर, जळगाव, नंदुरबार, नाशिक ग्रामीण, सीआयडी, विशेष सुरक्षा विभाग, आणि सद्या नाशिक शहरातील पंचवटी पोलीस स्टेशन गुन्हे शाखा येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक

 

राहायचे, असा निश्चय सीताराम कोल्हे यांनी मनाशी केला होता. खरे म्हणजे एक वेळ अशी आली होती, की त्यांच्याकडे परीक्षेला जाण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते.या पदावर कार्यरत होते. सध्या सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून गुन्हे शाखेत कामगिरी करीत आहेत.विशेष म्हणजे आतापर्यंतच्या त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी अनेक गुन्हे उघडकीस केले आहेत. त्यांच्या चांगल्या कामाची पोचपावती म्हणून त्यांना ७५० बक्षिसे १२५ प्रशंसापत्रे मिळाली असून, पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह तसेच प्रतिष्ठेचा गिरणा गौरव पुरस्कार ही त्यांना मिळाला आहे. एकूण ३२ वर्षांच्या काळातील चांगल्या कामगिरीबद्दल त्यांना पोलीस दलातील सर्वोच्च सन्मानाच्या राष्ट्रपती पदकाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे, तसेच डॉ. सीताराम कोल्हे यांना १५ ऑगस्ट २०२० रोजी स्वातंत्र्यदिनाच्या औचित्यावर राष्ट्र पर्तीच्या गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले होते. सन २०२० व २०२१ मध्ये कोरोना साथीमुळे पदक अंलकरण समारोह आयोजित करण्यात आलेला नव्हता.

मात्र दि. १३ ऑक्टोबर २०२२ रोजी राजभवन मुंबई येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते १५ ऑगस्ट २०२० व २६ जानेवारी २०२१ रोजी जाहीर करण्यात आलेल्या सर्व पदकप्राप्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांना महामहीम राष्ट्रपती यांनी पोलीस पदके देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये डॉ. सीताराम कोल्हे यांना देखील सन्मानित करण्यात आले.

डॉ. सीताराम कोल्हे यांनी क्रिमिनल सायकॉलोजीमध्ये पीएचडी मिळविली आहे. महत्त्वाची बाब अशी, की त्यांना आजपर्यंत ३० वर्षांच्या सेवा कालावधी मध्ये अतिशय क्लिष्ट, किचकट असे खून, दरोड्याचे गुन्हे उघडकीस आणून त्यामधील गुन्हेगार अटक करुन कौशल्यपूर्ण तपास केल्याने गुन्हेगार यांना न्यायालयातून शिक्षा लागली आहे. सेवाकलावधी मध्ये त्यांना गुणवत्तापूर्ण व उल्लेखनीय सेवेबद्दल पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले होते. राजभवन येथे अतिशय दिमाखदार सोहळ्याकरिता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

 

दैनंदिन जीवनात पोलीस अधिकारी म्हणून नोकरी करताना, समाजातील सर्वांच्या सोबत मैत्रीपूर्वक मिळून मिसळून वागतांना त्यांच्या ‘क्रिमिनल सायकोलॉजी’च्या वैयक्तिक ज्ञानाचाही ते कायमच वैयक्तिक सामाजिक मार्गदर्शनासाठी उपयोग करतात. त्यांना समाजकार्याची आवड असून, त्यांनी कोविड संक्रमणाच्या कालावधीत पोलीस दलातील कोविड पॉझिटिव्ह रुग्णांसाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून नाशिक शहर पोलीस दलाच्या ‘नोडल अधिकारी पदाची जबाबदारी उत्कृष्टरीत्या सांभाळली आहे.

डॉ. सीताराम कोल्हे यांच्या जीवनाच्या यशस्वी वाटचालीत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या त्यांच्या पत्नी वैशाली सीताराम कोल्हे व दोन्ही मुली व मुलगा यांचाही तेवढाच सहभाग आहे. तसेच त्यांच्या दोन्ही मुली, दोन्ही जावई आणि मुलगा हे सर्व उच्चशिक्षित असून उच्च पदांवर आहेत. आता ते शासकीय सेवेतून निवृत्त होत आहेत. त्यांच्या आयुष्याच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा…..!

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!