सहायक निबंधकास लाच घेतांना अटक…!
लाल दिवा-नाशिक,ता.९: निफाड लोकसेवक राजेश शंकर ढवळे , सहकार अधिकारी, श्रेणी १, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, निफाड. जिल्हा नासिक रा. कृष्णा अपार्टमेंट, फ्लॅट न ९, चेतना नगर, नासिक ९. लाचेची मागणी-1,50,000 तडजोडी अंती लाचेची मागणी-1,00,000/-लाचेची मागणी दिनांक ता.6/9/2023 लाचेचे कारण तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारी अर्जाचा अहवाल त्यांच्या बाजूने वरिष्ठांना पाठविण्यासाठी आलोसे हे त्यांचेकडे 1,50,000/- रुपयाची लाच मागणी करत असल्याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नासिक येथे नोंदवली होती. त्यानुसार दि. 6/9/2023 रोजी पंचा समक्ष लाच मागणीसंदर्भात पडताळणी करण्यात आली असता लोकसेवक यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडे 1,00,000/- रू लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविली. यासंदर्भात आज दि.9/11/2023 रोजी मुंबई नाका पोलीस स्टेशन, नासिक येथे लोकसेवक यांच्या विरुद्ध भ्र.प्र अधिनियम कलम 7, 7(अ ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.००
सापळा अधिकारी अनिल बडगुजर, पो. उप. अधीक्षक, ला.प्र. वि. नासिक
सापळा पथक,पोना दिपक पवार, पोशी संजय ठाकरे, पोना अविनाश पवार, चालक पोहवा संतोष गांगुर्डे सर्व नेमणूक लाप्रवि नासिक.पोना मनोज पाटील,तत्कालीन
मार्गदर्शक शर्मिष्ठा घारगे- वालावलकर मॅडम , पोलीस अधीक्षक, , लाप्रवि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक, माधव रेड्डी सो, अपर पोलीस अधीक्षक, लाप्रवि नाशिक
सहकार्य – श्री नरेंद्र पवार, वाचक पो उप अधीक्षक, लाप्रवि नासिक आरोपीचे सक्षम अधिकारी -* मा. विभागीय सहनिबंधक. नासिक
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
अँन्टी करप्शन ब्युरो, नासिक
दुरध्वनी क्र – 0253-2578230.
टोल फ्रि क्रं. 1064.