पेंडशेत गावी काजवा महोत्सवासाठी उपस्थित राहण्याचे तरुण उद्योजक तथा पर्यावरण प्रेमी विशाल खोले यांचे आवाहन…!
अकोला तालुक्यातील पेंडशेत गावी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासू 15 ते 16 जून पर्यंत काजवा महोत्सव आयोजित केला असून या निसर्गाशी साद घालणाऱ्या अनोख्या महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन तरुण उद्योजक पर्यावरण प्रेमी विशाल खोले यांनी केले आहे. काजवा महोत्सव 25 ते 26 मे त्यानंतर 1 ते 2 जुन, 8 ते 9 जून असे दोन दिवस
15 व 16 जुन आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवात विविध प्रकारचे खेळ, नृत्य, नाच गाणी, बैलगाडी सफर आदी मनोरंजनात्मक कार्यक्रमाची लयलूट करता येते. ठिकठिकाणी छोटे मोठे पेंट हाऊस उभारण्यात आले असून शुद्ध व मोकळ्या हवेच्या वातावरणात चमचमणारे काजवे बघून पर्यटक मंत्रमुग्ध होऊन जातात. निसर्ग प्रेमी आणि पर्यटकांनी एकदा तरी भेट द्यावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे. काजवा महोत्सवासाठी वडील पंढरीनाथ खोले, आई हिराबाई खोले, भाऊ स्वप्नील खोले कुटुंबाची मदत होते. पूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेल्या अकोला तालुक्यातील बारी, पेंडशेतजवळील महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेले कळसूबाई हे शिखर नावाजलेले आहे. या कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी पेंडशेत ह्या नावाचे गाव वसलेलं आहे. येथील तरुण उद्योजक पर्यावरण प्रेमी विशाल खोले यांनी एवरग्रीन भंडारदरा कॅम्प या नावाने काजवा महोत्सवाचे आयोजन केले आहे. अर्चना येवले, स्नेहल खोले, रोशन सूर्यवंशी, नितीन खादगीर, आदेश खोले, प्रसाद कोकाटे आदी परिश्रम घेतात.
सह्याद्रीच्या कुशीत डोंगरांनी वेढलेल्या पेंडशेत या गावी काजवा महोत्सव अलौकिक अप्रतिम निसर्गाच्या सहवासात आनंद द्विगुणित करतो.अबाल वृद्धांनी काजवा महोत्सवाला अवश्य भेट देऊन निसर्गातील स्वयंम प्रकाशित लूक लुकणाऱ्या काजव्यांचा चमत्कार अवश्य पहावा.
राजू देवळेकर, निसर्गप्रेमी इगतपुरी