खंडणी विरोधी पथकाची विशेष कामगिरी !

लाल दिवा, ता. २४ : पोलीस अंमलदार स्वप्नील जुंद्रे व पोशि. मंगेश जगझाप यांना गुप्त बातमीदार यांचे मार्फतीने उपनगर पोलीस स्टेशन कडील खंडणीच्या गुन्हयातील सिआरपीसी २९९ प्रमाणे पाहिजे आरोपी हा जेलरोड, पाण्याच्या टाकीजवळ येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती.

मिळालेल्या बातमी प्रमाणे श्रेणी पोउनि भोई व नमुद पोलीस अंमलदार यांनी पाहिजे आरोपी बाळु शंकर कदम वय ३२ वर्ष रा. प्रकाश आंबेडकर नगर, कॅनल रोड झोपडपट्टी, जेल रोड, नाशिक रोड, नाशिक |यास जेलरोड, पाण्याच्या टाकी जवळुन शिताफीने ताब्यात घेवुन त्याच्या कडे विचारपुस करता बाळु शंकर कदम वय ३२ वर्ष हा उपनगर पोलीस स्टेशन कडीला गुर नं २३५ / २०१८ भादवी ३८४, ३८५,३४१, ३४ मु.पो. कायदा कलम १३५ प्रमाणे दाखल गुन्हयात सन २०१८ पासुन फरार होता. तसेच त्याच्या कडे अधिक विचारपुस करता त्याच्या विरोधात यापुर्वी म्हसरूळ पोलीस स्टेशन गुरन २९७ /२०१९ भादवी कलम १४३, १४७, १४९, ३२३, ५०६, ५०४, सह मपोका १३५ अन्वये गुन्हा दाखल आहे. त्यास पुढील तपास व कारवाई कामी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उपनगर पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगीरी मा. श्री. अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त सो. नाशिक, मा. श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त, सो. गुन्हे व विशा., मा. श्री. वंसत मोरे, सपोआ, गुन्हे, सपोनि. प्रविण सुर्यवंशी, खंडणी विरोधी पथक, नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली श्रेणी पोउनि भोई, खंडणी विरोधी पथक, नाशिक शहर कडील नेमणुकीचे पोलीस अंमलदार सपोउनि सगळे, पोह १०६ रोकडे, पोह ७२२ भदाणे, पोना ९११ चकोर, पोशि. २३९२ जुंद्रे, पोशि. ४९७ सोनवणे, पोशि २३८९ नाधव, पोशि. ६३६ जगझाप, पोशि. २५०९ निकम, पोशि. | २२१८ चव्हान व मपोशि ८१० कदम यांनी केलेली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!