भाड्याने गाड्या घेत परस्पर विक्री करणाऱ्या भामट्याला अटक….भद्रकाली पोलीस ठाणेचे अधिकारी व अंमलदार यांची धडाकेबाज कामगिरी…!

लाल दिवा-नाशिक,ता.११: दि. २३/०९/२०२२ रोजी रात्री ०८:०० वाजेच्या सुमारास फिर्यादी हा त्याचे जिन मंझिल जवळ, खडकाळी, जुने नाशिक येथील दुकानावर असतांना त्याच्या परिचयाचा इसम नामे शादाब रहिम शेख, रा. खडकाळी, राईस मिल जवळ, जुने नाशिक याने फिर्यादीला विश्वासात घेवुन लबाडीच्या इरादयाने त्याचेकडुन मुंबईला जाणेसाठी त्याच्या मालकीची मारूती सुझुकी कंपनीची स्विफ्ट डिझायर पांढ-या रंगाची गाडी क्र.एम.एच.०५ ए.एक्स.६५७७ किंमत रूपये २,००,०००/- ची ही घेवुन गेला व त्याने फिर्यादीचा विश्वासघात करून त्याची वरील वर्णनाची व किंमतीची गाडी त्याला परत न करता त्याच्या गाडीचा अपहार केला आहे म्हणुन सदर प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाणेस गु.र.नं. २८९/२०२३ भादवि कलम ४२०,४०६ प्रमाणे दिनांक २२/०८/२०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा तपास भद्रकाली पो.स्टे. नाशिक शहर कडील सहा. पोलीस निरीक्षक शिवाजी बी. अहिरे हे करीत आहेत.

 

सदर गुन्हयातील आरोपी नामे शादाब अब्दुल रहिम शेख, वय ३४ वर्षे, रा.ए ब्लॉक, फ्लॅट नं.०३, मनोहर मार्केट, सारडा सर्कल, नाशिक, सध्या रा. रूम नं. ३०४, बिल्डींग नं. ०२, एच.पी. वाशीनाका, म्हाडा कॉलनी, चेंबुर, मुंबई-७१ यास तळोजा मध्यवर्ती कारागृह येथून ताब्यात घेवून त्याचेकडून सपोनि शिवाजी अहिरे व पो. अं. /२३५२ सूरन पगारे यांनी त्यांचे कौशल्य पणाला लावुन शादाब अब्दुल रहिम शेख याचेकडे विचारपुस केली असता त्याने वरील गुन्हयातील स्विफ्ट डिझायर गाडी क. एम. एच.०५ ए.एक्स. ६५७७ ही अकोला येथे विक्री केली असल्याची माहिती दिली. त्यावरुन लागलीच सपोनि अहिरे व त्यांचेसोबत गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांचे पथकाने सदरची गाडी ही ताब्यात घेतली. शादाब अब्दुल रहिम शेख याचेकडे आणखी विचारपुस केली असता त्याने नाशिक येथील ०१) हयुंडाई कंपनीची वर्ना गाडी क एम.एच. ०२ सी. एल. व ०२) महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ क. एम.एच. १५ बी. एन. ७३३१ या दोन गाडया अनुक्रमे भगूर, नाशिक व मुंबई येथे विक्री केली असल्याचे सांगितल्याने पुन्हा सपोनि अहिरे व त्यांचेसोबत पोउनि राम शिंदे, पोउनि दिपक पटारे, पो. अं./२३५२ सूरन पगारे यांचे पथकाने नमूद दोन्ही गाडया ताब्यात घेतल्या.

 

  • सदर गुन्हयातील आरोपी याचेकडून एकूण तीन चारचाकी वाहने ताब्यात घेण्यात आलेले असून आणखी काही वाहने त्याचेकडून ताब्यात घेवून इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

 

तसेच डिसेंबर २०२० पासून आजपावेतो ०१) खालिद हनिफ शाह वय ४५ वर्षे, रा. गरीब नवान दुकानासमोर तांबापुरा जळगाव, ०२) अमोल बापू चव्हाण रा. इंदिरानगर गोंदेगांव ता. सोयगांव, नि. छत्रपती संभाजीनगर ०३) अमोल वालचंद बिंबे रा. पाळणाघर जवळ, व्दारकानगर, बुलडाणा ०४) विवेक उल्हास पाटील, डिव्हीजनल मॅनेजर, श्रीराम सिटी सटी युनियन फायनान्स, शाखा जळगाव यांनी संगनमत करून हाजी चिरागोद्यीन काजी शेख रा. काजीपुरा, जुने नाशिक याची ०१) महिंद्रा पिकअप क्र. एम. एच. ३२ ए.जे. ०६०८०२) फोर्ब्स कंपनीची टेम्पो ट्रॅव्हलर क. एम.एच. १२ पी.क्यू. ७९९५०३) टाटा कंपनीची व्हिस्टा क. एम. एच. ०४ जी. डी. ४९५९ ही तिन्ही वाहने मुस्कान ट्रॅव्हल्स वाहन विक्री केंद्र काजीपुरा व व्दारका येथून विक्री करण्यासाठी नमूद इसमांना विश्वासाने सोपविली असता त्यांनी सदर वाहनांची परस्पर विक्री करुन वाहनांचा अपहार केला म्हणून भद्रकाली पो.स्टे. नाशिक शहर येथे । गु.र.नं. २५४/२०२३ भादंवि कलम ४२०,४०६,३४ प्रमाणे दिनांक २०/०७/२०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा तपास भद्रकाली पो.स्टे. नाशिक शहर कडील सहा. पोलीस निरीक्षक चंद्रकात सपकाळे हे करीत आहेत.

 

सदर गुन्हयातील आरोपी नामे अमोल वालचंद बिंबे रा. पाळणाघर जवळ, व्दारकानगर, बुलडाणा याचा शोध घेवून त्यास अटक करुन सपोनि चंद्रकात सपकाळे व पो. अं./१३२६ किरण निकम यांनी त्यांचे कौशल्य पणाला लावुन अमोल वालचंद बिंबे याचेकडे विचारपुस करुन गुन्हयातील फोर्ब्स कंपनीची टेम्पो ट्रॅव्हलर क. एम.एच.१२ पी. क्यू. ७९९५ ही ताब्यात घेतली.

 

सदरची कारवाई ही मा. श्री. संदीप कर्णिक साो, (पोलीस आयुक्त, नाशिक शहर), मा. श्री. किरण चव्हाण, पोलीस उप-आयुक्त, (परिमंडळ-१) व मा. सिध्देश्वर धुमाळ, सहा. पोलीस आयुक्त, (सरकारवाडा विभाग), नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी अहिरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत सपकाळे, पोलीस उपनिरीक्षक राम शिंदे, पोउनि दिपक पटारे, पोलीस अं . सूरज पगारे, पो. अं. किरण निकम तसेच गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार संदिप शेळके, पोअं. सागर निकुंभ, यांनी केलेली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!