संजय राऊतांच्या दिशेने चपलांची पिशवी फेकली..!
लाल दिवा-नाशिक,ता.११: सोलापूर । शिवसेनेचे खासदार संजय राऊत रविवारी सोलापुरात होते. सायंकाळी बाळे येथील एका हॉटेलच्या उद्घाटनासाठी गेले असता, त्यांच्या वाहनाच्या दिशेने चपलांनी भरलेली पिशवी भिरकावण्यात आली. बाळे उड्डाणपुलावरून काही तरुण कार्यकर्त्यांनी हे कृत्य केल्याचे दिसून आले. ‘नारायण राणे जिंदाबाद’ अशा घोषणा त्यांनी दिल्या. त्यानंतर ते फरार झाले. खा. राऊत एका लग्नाच्या कार्यक्रमासाठी रविवारी सोलापुरांत होते. त्यावेळी हा प्रकार घडला. याप्रकरणी तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
1
+1
+1
1