नाशिक लोकसभेत अजित चव्हाण ठरू शकतात डार्क हॉर्स ?…… हालचालींना आला वेग….!
लाल दिवा-नाशिक,ता.२६ : नाशिकची जागा लोकसभेसाठी भारतीय जनता पक्षाला सोडावी यासाठी नाशिकच्या सर्व आमदार व पदाधिकाऱ्यांनी देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. भाजपला नाशिकची जागा सोडावी असा आर्त टाहो सगळ्यांनी नेतृत्वाकडे फोडला. नाशिकची जागा भाजपला सुटली तर भारतीय जनता पक्षाचे सह-मुख्य प्रवक्ते, भाजपा बुद्धिजीवी प्रकोष्ठाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस व श्रीकांत भारतीय यांचे खास गोटातील व निकटवर्तीय अजित चव्हाण हे देखील यात बाजी मारून डार्क हॉर्स ठरू शकतात ? भारतीय जनता पक्षाच्या मिशन २०२४ निवडणूक समन्वय समितीच्या राज्य सहसमन्वयक पदाची महत्वपूर्ण जबाबदारी अजित चव्हाण यांच्याकडे आहे. गुजरात मधून केंद्रीय नेतृत्वाच्या निकटवर्ती असलेल्या मंडळींनी त्यांच्यासाठी प्रयत्न चालवण्याची सूत्रांकडून माहिती आहे. त्याचबरोबर नाशिक येथून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही वरिष्ठांनी देखील भाजप नेतृत्वाकडे अजित चव्हाण यांच नाव लावून धरल्याची माहिती आहे. घराघरात ओळखीचा चेहरा, उत्कृष्ट वक्ता, अजातशत्रू प्रतिमा, भाजपा मध्ये अल्पावधीत राज्य व स्थानिक पातळीवर सर्वांशीच असलेले मधुर संबंध व उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आ.श्रीकांत भारतीय, गिरीश महाजन या वरिष्ठ नेतृत्वाशी असलेली जवळीक त्यामुळे अजित चव्हाण यांच्या वरती अल्पावधीत पक्षात महत्त्वाच्या जबाबदारी देण्यात आल्या. गेले दोन दिवस अजित चव्हाण दिल्ली, गुजरात या ठिकाणी केंद्रीय नेतृत्वाच्या जवळच्या नेत्यांशी गाठीभेटी घेऊन रात्री उशिरा नागपूर येथे रवाना झाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. सोलापूर येथे राम सातपुते यांच्याप्रमाणेच पक्ष नेतृत्वाच्या उमेदवार देण्याचं धक्का तंत्रही असू शकत लोकसभा उमेदवारीसाठी अजित चव्हाण परफेक्ट मटेरियल असल्याने नाशिकची जागा भाजपला सुटली तर अजित चव्हाण हे या शर्यतीत ‘डार्क हॉर्स’ ठरू शकतात. असे बोलले जात आहे.