शहरातील खून सत्रानंतर पोलीस आयुक्तांना आली जाग…… देवदर्शना नंतर आता गुन्हेगारांना पोलीस आयुक्त देणार दंडुक्याचे दर्शन…!

लाल दिवा-नाशिक,ता.२८ : शहर आयुक्तालयाच्या हद्दीत आयुक्त पदाची धुरा सांभाळताच दोन खुनाच्या घटनेने शहर परिसर हादरून गेले होते, याची गंभीर दखल घेत नवनिर्वाचित पोलीस आयुक्त संदीप कर्णिक अॅक्शन मोडवर आल्याचे दिसून येत आहे

संध्याकाळपासून चालू शहरभर गुन्हेगारांची धरपकड करण्यास आयुक्तालयातील पोलिसांनी सुरुवात केली असून शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये कोंबिंग तसेच ऑल आऊट ऑपरेशन राबवण्यास सुरुवात करण्यात आली आहे त्याचबरोबर मद्यपान करून रस्त्यावर टवाळकी करणारे तळीरामांना देखील खाकीने चांगलाच दणका देत ताब्यात घेतले आहे.

यापुढे देखील शहरात नित्यनेमाने गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी रस्त्यापर उतरून व्हीजवल पोलीसिंग तसेच इफेक्टिव्ह पॉलिसींवर जास्तीत जास्त भर दिला जाणार आहे. तसेच शहर लवकरच भयमुक्त करणार असल्याबाबत देखील शहर आयुक्तालय कटिबद्ध असल्याचा संदेश सर्वसामान्य नाशिककरांना देण्यात येत आहे. पकडण्यात आलेल्या टवाळखोरांवर तसेच मद्यपींवर 151 प्रमाणे कारवाई करण्यात येणार असून यापुढे कुणाचीही गय केली जाणार नाही. असा सज्जड इशारा शहर पोलिसांनी गुन्हेगारांना दिला आहे. या कारवाईदरम्यान चार उपायुक्त, सात सहाय्यक पोलीस आयुक्त, 30 पोलीस निरीक्षक, 125 पोलीस उपनिरीक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षक तसेच 1150 पोलीस सहभाग होता..

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!