गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळाचा उत्साह वाढवण्यासाठी दरवर्षी स्पर्धेचे आयोजन करावे – ऍड. नितीन ठाकरे….!
गणेश उत्सव आरास स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न, दक्ष न्यूज आणि पोलीस मित्र परिवार समन्वय समितीने घेतली होती स्पर्धा
लाल दिवा-नाशिक,ता.२२ : समाजात काम करत असताना सार्वजनिक क्षेत्रात आपला बहुमूल्य वेळ देऊन नेहमी सहकार्य करणारे गणेशोत्सव मंडळ असतात या गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी दिवस-रात्र मेहनत करून चांगले देखावे सादर करत असतात त्यांच्या या कलेला साथ देत त्यांचे कौतुक अभिनंदन करणे गरजेचे असते आणि हे काम दक्ष न्यूज व पोलीस मित्रपरिवार समन्वय समितीने केले आहे. गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांचा उत्साह मोठ्या प्रमाणात वाढत राहो म्हणून दरवर्षी अशा स्पर्धेचे आयोजन आपल्या संस्थेने करावे असे प्रतिपादन मविप्रचे सरचिटणीस नितीन ऍड. ठाकरे यांनी केले.
दक्ष न्यूज आणि पोलीस मित्र परिवार समन्वय समिती तर्फे आयोजित गणेश उत्सव आरास स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
गणेश उत्सव हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे सार्वजनिक मंडळांकडून आणि घरोघरी तयार करण्यात येणारी आकर्षक सजावटीची आरास. या पार्श्वभूमीवर ‘दक्ष न्यूज’ आणि पोलीस मित्र परिवार समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सजावट व आरास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ बुधवार दिनांक २० डिसेंबर २०२३ रोजी नाशिक येथील लायन्स क्लब हाॅल येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मराठा विद्या प्रसारक मंडळाचे सरचिटणीस एड. नितीन ठाकरे, हिंदू एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी, मराठी कलाकार अभिनेते प्रवीण महाजन, नाशिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे, साधना मिसळचे संचालक राजन आमले, विभागीय अधिकारी संक्रमण रक्तपेढीचे डॉ पुरषोत्तम पुरी, श्रीराम क्लासेसचे संचालक कैलास देसले उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करीत संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार दक्ष न्यूज व पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस मित्र समन्वय समिती महाराष्ट्र कार्याध्यक्ष सुनील परदेशी व दक्ष न्यूजचे संचालक व संपादक करणसिंग बावरी यांनी केले. यावेळी प्रमुख मान्यवर रामसिंग बावरी, समीर शेटे, कैलास देसले व डॉ पुरी यांनी आपले मनोगत व्यक्त करीत कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर मुख्य बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये घरगुती सजावट स्पर्धेत प्रथम क्रमांक सारंग पाटील यांना मिळाला त्यांनी प्लास्टिक मुक्ती हा समाजप्रबोधन देखावा सादर केला होता. दुसरा क्रमांक प्रिती पवार यांना मिळाला त्यांनी जनजागृती पर आरोग्य त्रिसूत्री, योगसाधना हा देखावा सादर केला होता. तृतीय क्रमांक रत्नाकर थोरात यांना मिळाला त्यांनी जुनी आठवण असलेला सर्व जुन्या इतिहास जमा असलेल्या गोष्टींचा इकोफ्रेंडली देखावा सादर केला होता. तसेच उत्तेजनार्थ बक्षीस हेमलता शिंपी – देखावा चंद्रयान, प्रशांत साळुंखे – देखावा पंडित मिश्रा शिव महापुराण व अपर्णा नाईक – देखावा वृध्दाश्रम गरज यांना मिळाला आहे.
- पूर्व विभागातून प्रथम क्रमांक श्री प्रतिष्ठान इंदिरानगर, दुसरा क्रमांक राजे छत्रपती सामाजिक प्रतिष्ठान, तिसरा क्रमांक हिंदू जनसंपर्क कार्यालय सागर देशमुख व उत्तेजनार्थ मनपा पूर्व विभागीय कार्यालय यांना देण्यात आला.
- नाशिकरोड विभागातून प्रथम क्रमांक बालाजी सोशल फाउंडेशन, दुसरा क्रमांक जय भवानी रोड मित्र मंडळ व तिसरा क्रमांक नवनाथ मित्र मंडळ जेलरोड यांना देण्यात आला.
- सातपूर विभागातून प्रथम क्रमांक सातपूर चा राजा मित्र मंडळ, दुसरा क्रमांक नवश्या गणपती ट्रस्ट, तिसरा क्रमांक अमर ज्योत मित्र मंडळ व उत्तेजनार्थ पी एल ग्रुप यांना देण्यात आला.*
- सिडको विभागातून प्रथम क्रमांक डी जी सूर्यवंशी मित्र मंडळ, दुसरा क्रमांक सिद्धिविनायक मित्र मंडळ, तिसरा क्रमांक श्री कृष्ण कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ व उत्तेजनार्थ योद्धा ग्रुप यांना देण्यात आला. तसेच विशेष बक्षीस नांदुर शिंगोटे सिन्नर येथील दि गोल्डन मित्र मंडळ व विभागीय संदर्भ रुग्णालय येथील संक्रमण रक्तपेढी केंद्र नाशिक यांना देण्यात आले.
या कार्यक्रमात सुनिल परदेशी, विरेंद्रसिंग टिळे, राजेंद्र आहेर, राजेंद्र लिंबकर, अमित कबाडे, लक्ष्मण धोतरे, राजेंद्र जडे, सुनिल गोडसे, सुभाष कापडी, प्रकाश बर्वे, दिपक डोळसे, विजय शिरसाठ, सुरेश शिरोडे, रोहित पारख, राजेंद्रसिंह पवार, प्रंशात पवार, प्रंशात सुर्यवंशी, रुषीकेश सोनार, पल्लवी भावसार, असलम शेख, प्रंशात हिरे, दिनेश पगारे, योगेश पाटील, मानसी देशमुख, चंद्रकांत महाले, तुषार शामसुखा, नंदकिशोर आव्हाड, अब्बास हुसेनी, अविनाश अस्वले, राहुल देसाई, अनिल बागुल, चंत्रपालसिंह राजपूत किरणसिंह राजपूत लोकेश कटारिया मोहिनी भगरे, रोहिणीताई कुमावत माया रमेशसिंह ठाकूर, राधा दोंदे, सारिका परदेशी आरती, आहिरे कामिनी, भानुवंशे धनश्री गायधनी, रुपाली तांबारे, शीतल चंद्रात्रे, स्मिता मुठे, भारती माळी, रेखा गिते, मंजुषा लोहगावकर, लिला व्यवहारे, योगिता चव्हाण, सुनिता जाधव, सविता सिंह, गायत्री बिरारी, सुनीता धनतोळे, गीता शामसुखा, उमा परदेशी, सिमी राणा व स्वाती पाटील सह दक्ष न्यूज आणि पोलीस मित्र परिवार समन्वय समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
- कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मोहिनी भगरे यांनी केले.