सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणा-या टवाळखोर इसमांवर उपनगर पोलिसांची विशेष मोहिम राबवून केली कारवाई…!
लाल दिवा-नाशिक,ता.२२ : मा. पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी पोलीस आयुक्तालय हददीत दिनांक २१/१२/२०२३ ते दिनांक २३/१२/२०२३ यादरम्यान मोकळे पटांगण, गार्डन, पडिक वसाहत, जॉगिंग ट्रॅक अशा सार्वजनिक ठिकाणी उपद्रव तयार करून शहरातील शांतता बिघडवणारे इसमांचा शोध घेवुन कारवाई करण्यासाठी विशेष मोहिम व नाकाबंदीचे आयोजन करून कारवाई करण्याचे सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच गुन्हेशाखा यांना आदेशीत केले आहे.
मा. पोलीस आयुक्त यांचे आदेशानुसार मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे व मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१ व २ यांचे मार्गदर्शनानुसार नियमीत सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणा-या इसमांवर कडक कारवाई करण्यात येत असुन आज दिनांक २२/१२/२०२३ रोजी १८.०० ते २०.०० वाजे दरम्यान पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाणे कडील तसेच गुन्हेशाखेकडील सर्व युनिट यांनी सार्वजनिक ठिकाणी, मदयपान, धुम्रपान करून सुव्यवस्था भंग करणा-या टवाळखोर इसमांवर कारवाई करणेकामी विशेष पथके तयार करून सर्व पोलीस ठाणे हददीत विशेष मोहिम व नाकाबंदी राबविण्यात आली.
सदर पथकांनी विशेष मोहिमे दरम्यान परिमंडळ १ हददीत पंचवटी, आडगाव, म्हसरूळ, भद्रकाली, सरकारवाडा, गंगापूर, मुंबईनाका व गुन्हेशाखा युनिट -१, खंडणी विरोधी व गुंडा विरोधी पथक यांनी सार्वजनीक ठिकाणी उपद्रव करणा-या १६६ इसमांविरुध्द व परिमंडळ-२ हददीतील सातपुर, अंबड, चुंचाळे चौकी, इंदीरानगर, उपनगर, नाशिकरोड, दे. कॅम्प, गुन्हेशखा युनिट -२, दरोडाशस्त्र विरोधी व अंमली पदार्थ विरोधी पथक यांनी २१२ इसमांविरुध्द अशा एकुण ३७८ इसमांविरूध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११२/११७ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. तसेच नाकाबंदी दरम्यान एकुण ०८ वाहनांवर मोटार वाहन कायदयाचे उल्लंघनार्थ रू. ४०००/- दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यापुढे वेळोवेळी विशेष मोहिमा राबवुन कारवाई करण्यात येणार आहे.
- सदर कारवाई दरम्यान तयार करण्यात आलेल्या विशेष पथकामध्ये गुन्हेशाखेकडील तसेच पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सहभाग घेवुन कारवाई केली आहे.