श्री. गणेशोत्सव सन २०२३ व ईद-ए-मिलाद च्या अनुषंगाने मा. अपर पोलीस महासंचालक यांचेकडून घेण्यात आला आढावा….!
लाल दिवा -नाशिक,दि.६:सन २०२३ मध्ये मोठ्या उत्साहात श्री. गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद संपुर्ण राज्यात तसेच नाशिक शहरात साजरा करण्यासाठी नागरीक सुसज्य आहेत. त्या अनुषंगाने मा. डॉ. रविंद्र सिंगल, अपर पोलीस महासंचालक, वाहतुक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने नाशिक जिल्हा व परिक्षेत्र निरक्षण अधिकारी म्हणुन दिनांक ०६/०९/२०२३ रोजी पोलीस आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेतली.
सदर बैठकीत नाशिक जिल्हयातील व परिक्षेत्रातील श्री. गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद निमीत्ताने करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेण्यात आला त्यासोबत कायदा व सुव्यवस्थेची माहिती घेण्यात आली. श्री. गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद काळात तसेच विसर्जन मिरवणुकीत जास्तीत जास्त स्वयंसेवक व विशेष पोलीस अधिकारी यांचा वापर करावा तसेच ड्रोनचा वापर करण्याबाबत सुचना देण्यात आल्या. गणेश उत्सव काळात डी.जे. न वाजवण्याबाबत गणेश मंडळांमध्ये जनजागृती करावी याबाबत सुचना देण्यात आल्या.
श्री. गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या बंदोबस्ताचे नियोजन करुन गुन्हेगार वृत्तीचे इसमांविरुध्द प्रतिबंधक कारवाई करावी जेणे करुन कायदा व सुव्यवस्था आबाधीत राहील या संदर्भाने मा. डॉ. रविंद्र सिंगल, अपर पोलीस महासंचालक, वाहतुक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी सुचना देवून मार्गदर्शन केले.
सदर बैठकीस मा. डॉ. रविंद्र सिंगल, अपर पोलीस महासंचालक, वाहतुक, महाराष्ट्र राज्य, मुंबई, मा. श्री. अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त, नाशिक शहर, मा. श्री. बी. जी. शेखर पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, मा. श्री. शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामिण, मा. श्री. संजय बारकुंड, पोलीस अधीक्षक, धुळे, मा. श्री. पी. आर. पाटील, पोलीस अधीक्षक, नंदुरबार, सर्व पोलीस उप आयुक्त, नाशिक शहर, अपर पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण, अपर पोलीस अधिक्षक, जळगांव हे उपस्थीत होते.