धमक्यांमुळे तीन वर्षे दबलेला आवाज; आता आडगाव पोलिसांकडे तक्रार दाखल !
आडगाव पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल
लाल दिवा-नाशिक,आडगाव, ०५ ऑगस्ट २०२४: येथील पोलीस स्टेशनमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक ११ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी साडेआठ वाजता, मनोज रतन मेघवाल (वय २८, रा. अमृतधाम, नाशिक) याने फिर्यादीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून सोमेश्वर येथील बालाजी मंदिर आणि त्यानंतर त्रंबकेश्वर येथील ब्रम्हगिरी लॉजवर नेले. तेथे त्याने फिर्यादीची मर्जी नसताना तिच्यावर बलात्कार केला. इतकेच नव्हे तर त्याने तिचे मोबाईलमध्ये फोटो काढले आणि जर तिने याबाबत कुणाला काही सांगितले तर तिच्या आई-वडिलांना मारून टाकण्याची धमकी दिली.
घटनेनंतर बराच काळ उलटून गेल्यानंतर पीडितेने धैर्य एकवून आडगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा क्रमांक २४६/२०२४ अन्वये भादंवि कलम ३७६, ५०६ आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा तपास सपोनि पाटील हे करत आहेत. पोलीस अधिकारी खैरणार यांनी रात्री ११:३० वाजता घटनास्थळी भेट देऊन तपासाला सुरुवात केली आहे.