जेलरोडवर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, वृद्धा लुटली!

दिवसाढवळ्या दरोडे वाढले, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

लाल दिवा-नाशिक, दि.०२ सप्टेंबर २०२४: उपनगर पोलीस स्टेशन हद्दीतील नारायणबापूनगर, जेलरोड येथे काल रात्री ८:२० वाजण्याच्या सुमारास एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरीचा धक्कादायक प्रकार घडला.  

५९ वर्षीय वासंती विजयकुमार आहेरे (रा. दिपविसावा बंगला, रामदास स्वामी लेन नं. २, टाकळी रोड, उपनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्या भाजीपाला घेऊन घरी परतत असताना जेलरोडवरील इच्छामणी जॉगिंग ट्रॅक समोर, नंदिनी अपार्टमेंटजवळ एका काळ्या रंगाच्या अॅक्टिव्हा मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात इसमाने त्यांच्या गळ्यातील ४५ ग्रॅम वजनाची सोनसाखळी (किंमत १,३५,०००/- रु.) आणि लॉकेट हिसकावून पळून गेला. 

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सपकाळे, सपोनि चौधरी, सपोनि वायकर आणि तपास अधिकारी सपोनि बैसाणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. 

ही घटना परिसरात चांगलीच गाजली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!