इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शाळकरी मुलीची लिफ्टमध्ये छेडछाड, आरोपीला अटक

१० रुपयांसाठी मुलीची अस्मिता पणाला लावणारा तरुण कोण?

लाल दिवा-नाशिक,दि‌.२८:- इंदिरानगर, नाशिक – येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका इमारतीच्या लिफ्टमध्ये शाळेतून घरी परतणाऱ्या अल्पवयीन मुलीची छेडछाडी करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तरुणाने लिफ्टमध्ये मुलीला एकटी पाहून १० रुपये देण्याचे आमिष दाखवत चुंबन मागितल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

दिनांक २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. पिडीत मुलगी शाळेतून घरी परतत असताना आपल्या इमारतीच्या लिफ्टमध्ये एकटी चढली होती. त्याचवेळी २२ वर्षीय विकास कैलास बाविस्कर नावाचा तरुण तिच्यासोबत लिफ्टमध्ये आला. लिफ्टमध्ये एकटे असल्याचा गैरफायदा घेत त्याने मुलीला १० रुपये देऊन चुंबन मागितले. 

घाबरलेल्या मुलीने घरी जाऊन आपल्या पालकांना याबाबत सांगितले. संतप्त पालकांनी तात्काळ इंदिरानगर पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी विकास बाविस्करला ताब्यात घेत त्याच्याविरोधात भादंवि कलम ७५ सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम १०, १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. महिला पोलिस उपनिरीक्षक बारेला या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
2
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!