३००० विद्यार्थ्यांना नोकरी देणाऱ्या गरुडझेप अकादमीचा गौरव; ३०० यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार, ११ पालकहिन मुलांना घेतले दत्तक… उपजिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, कॅप्टन रुचिरा जैन, आ. प्रशांत बंब, डॉ. सुनीता मोडक, संचालक सुरेश सोनवणे, निलेश सोनवणे यांची उपस्थिती….
छत्रपती संभाजीनगर……प्रत्येकाला वाटत यश संपादन करावा.अनेकांना ते कसं संपादन करायचं यात प्रश्न असतो.कठीण परिश्रम घेतले तरच यश मिळते.तुमचा अप्रोच सांगतो तुम्ही यशस्वी होणार की नाही.यासाठी स्वतःच आत्मपरीक्षण केलं पाहिजे.व्हॉटसअप माहितीवर विश्वास ठेवू नका.नॉलेज पार्ट कशात दडला? हे कळलं तर नक्की यश मिळते असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनी केले.
गरुड झेप अकॅडमीतर्फे ३०० यशवंत विद्यार्थ्यांचा भव्य शुक्रवार दि.३० रोजी तिसगाव फाट्यावर भाव सत्कार करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उप जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, कॅप्टन रुचिरा जैन, आ.प्रशांत बंब, डॉ सुनीता मोडक ,संचालक सुरेश सोनवणे,निलेश सोनवणे उपस्थित होते.यावेळी पुढे बोलताना लोखंडे म्हणाले की,अभ्यासाचा टाईम टेबल तयार करणे गरजेचे आहे.ज्या वयात आहे त्या वयात वादळाचा आणि तणावाचा काळ असतो.यात अनेक स्वप्न तयार होतात.अश्या परिस्थितीत आपल्याला वेळेचं नियोजन स्थित ठेवत असते.नापास झाल्यावर स्वतःच्या अतून आवाज येतो तुला हे जमणार नाही.या नैराश्याला फाईट करता आली तर यशसवी होते अस लोखंडे म्हणाले.
देशात बेरोजगारी व्यसनाधीनता वाढते अस म्हणता मात्र दुसरीकडे बघितलं तर गरुड झेपच्या विद्यार्थी व त्यांच्या आई वडीलांच्या चेहऱ्यावरचे आनंद तुम्हाला सांगेल जिद्द असेल तर नक्की सरकारी नोकरी मिळते.गरुड झेप नावाने लावलेलं रोप आज एका विशाल वटवृक्षाच्या रूपाने नावारूपाला आले आहे.देशभरात या रोपाचे ६ हजार विद्यार्थी नोकरीला लागले आहे. संस्था आणि विद्यार्थी ही नोकरी आई वडिलांच्या चरणी अर्पण केला अस प्रतिपादन गरुड झेप चे संस्थापक सुरेश सोनवणे यांनी केले. टू व्हीलर विजेते बीएसएफ विजया शेटे व इंडियन नेव्ही एस एस आर अनिकेत शिंदे हे आहेत.
- यशस्वी विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया…..
माझ्या नवऱ्याने सोडून दिलं.मला रुग्णालयात काम करताना गरुड झेप अकॅडमी बाबत कळलं.मी प्रवेश घेतला तेव्हा मातीचा गोळा होते.आज मला पोलीस दलात भरती होत आल.या वर्दीच श्रेय सुरेश सोनवणे व गरुड झेप परिवाराला जाते.
- –कविता साळुंखे,महारष्ट्र पोलीस
१२ वी मध्ये लग्न करण्याचा निर्णय घरच्यांनी घेतला.मला त्याने नकराल.तेव्हा मी पेटून उठले.मी गरुड झेप अकेदमी जॉईन केली.सहा महिन्यात अकॅडमी मध्ये माझी कडून कसून सराव करून घेतला.आज मी नोकरी मिळवली.तयारी करणाऱ्या मुलींनी यामुळे लग्नाच्या सात फेऱ्या मारण्यापेक्षा भविष्यासाठी फेऱ्या मारल्या तर भविष्य उज्वल होत.
- –दिपाली सपकाळ, महारष्ट्र पोलीस
आमची परिस्थिती नव्हती,इथे प्रवेश घेतल्यावर त्यांनी कसून सराव करून घेतला.यावेळी अनेक मनात प्रश्न होते.आज माझी लेक महाराष्ट्र पोलीस झाली.मला तिचा लेक म्हणून तिचा मला सार्थ अभिमान आहे.इतर मुलांनीही पालकांच्या कष्टाची जाणीव ठेवली पाहजे.
– संगीता जाधव,पालक.
-
११ अनाथ विद्यार्थी घेणार दत्तक…..
पालक नसलेल्या ११ मुला मुलींना दत्ता घेतलं जाणार आहे.आपल्या परिसरात असे विद्यार्थी असतील असतील तर कृपाया गरुड झेप अकॅडमी ला माहिती द्या. आम्ही या सर्व विद्यार्थांच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेणार आहे.
– डॉ प्रा सुरेश सोनवणे.संचालक गरुड झेप अकॅडमी
–