नाशिक महापालिका ने एमएनजीएल कंपनीला रस्ते खोदण्यास मनाई केली….!

लाल दिवा-नाशिक,दि.३०:- नाशिक महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाने महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) कंपनीला पावसाळ्यात रस्ते खोदण्यास मनाई केली आहे. एमएनजीएलने शहरात गॅस पुरवठा करण्यासाठी ४.१८ किलोमीटरचे रस्ते खोदण्यासाठी परवानगी मागितली होती.

 

मागील काळात एमएनजीएलला २४० किलोमीटर रस्ते खोदण्याची परवानगी देण्यात आली होती, त्यापैकी १६० किलोमीटर रस्त्यांची खोदाई करण्यात आली. परंतु, खोदाईनंतर रस्त्यांची दुरुस्ती योग्य प्रकारे न झाल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती.

या पार्श्वभूमीवर, १५ जून रोजी महापालिकेने पावसाळ्यात रस्ते खोदण्यास बंदी घातली होती. पावसाळ्यानंतरच रस्ते खोदण्याची परवानगी देण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले होते.

तरीसुद्धा, एमएनजीएलने पुन्हा एकदा रस्ते खोदण्यासाठी परवानगी मागितल्याने महापालिकेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. खोदलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्याबरोबरच, मंजूर परवानगी अंतर्गत उर्वरित रस्त्यांची खोदाई पूर्ण करावी आणि त्यानंतरच पुन्हा परवानगी मागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!