महाराष्ट्रातील सिंघम अधिकारी…. पोलीस आयुक्त मा. संदीपजी कर्णिक साहेब…

यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिककरांकडून शुभेच्छांचा वर्षाव……!

लाल दिवा : अवघ्या काही दिवसांमध्ये नाशिकचे पोलीस आयुक्त संदीपजी कर्णिक यांनी आपल्या कार्याचा ठसा उंमटवून नाशिककरांचे मन जिंकल्याचे दिसून येत आहे. त्यांचा आज वाढदिवस असल्यामुळे सकाळपासूनच त्यांच्यावर नाशिककरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. नाशिककरांचे प्रेम पाहून कर्णिक साहेब सुद्धा गहिवरले असतील. आज पर्यंतच्या इतिहासामध्ये ज्यांनी ज्यांनी नाशिक शहरांमध्ये चांगले योगदान दिले आहे. त्यांना नाशिककरांनी नेहमीच डोक्यावर घेतले आहे. त्यापैकीच एक म्हणजे पोलीस आयुक्त संदीपजी कर्णिक आहेत. नागरिकांच्या हिताचा विचार करतानाच त्यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हिताचा देखील निर्णय घेतले आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूने त्यांच्यावर कौतुकाचा वर्ष होत आहे. गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी देखील आटोक्यात आणण्यात त्यांना यश मिळाले आहे. एवढेच नव्हे तर गुन्हेगारांना जेरबंद करत तडीपारीचे आदेश सुद्धा त्यांनी दिलेले आहेत. आज खऱ्या अर्थाने पोलीस रस्त्यावर दिसत आहे. ही त्यांचीच कृपा म्हणावी लागेल. यापूर्वी काही पोलिस आयुक्त आले. परंतु त्यांनी केवळ पाट्या टाकण्याचे काम केले. तर कोणी शायनीग मारण्याचे काम केले. त्यातच त्यांचे दिवस गेले. त्यामुळे त्यांच्यावर नाशिककरानीं नाराजी देखील व्यक्त केली होती. परंतु संदीप जी कर्णिक यांना कोणीही भेटायला गेल्यानंतर त्यांचा आदर करणे, त्यांच्याशी दोन शब्द बोलणें, त्यांना समजून घेणे हे त्यांनी काम केले आहे. एवढेच नव्हे तर जॉगिंग ट्रॅक वर जाऊन जेष्ठ नागरिकांचे मत जाणून घेण्याचा प्रयोग यशस्वी ठरला आहे त्यामुळे ते नाशिककरांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. त्यांचा आज वाढदिवस असल्यामुळे सकाळपासूनच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसून येत आहे. लाल दिवा कडून पोलीस आयुक्त संदीपजी साहेब यांना वाढदिवसाच्या लाख-लाख हार्दिक शुभेच्छा ! त्यांच्या हातून आणखी चांगले काम व्हावे हीच शुभेच्छा

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!