एकनाथ शिंदे यांना सोडचिठ्ठी देत ‘स्वराज्य’ पक्षाच्या सिन्नर तालुका प्रमुख पदी शरद शिंदे यांची नियुक्ती….!

जिल्हाप्रमुख डॅा.रुपेश नाठे यांचा हस्ते नियुक्तीपत्र प्रदान.

सिडको विशेष प्रतिनिधी :-शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे तालुका प्रमुख शरद शिंदे यांचा स्वराज्य पक्षा मध्ये प्रवेश व तालुका प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत सिन्नर मतदारसंघावर विशेष लक्ष ठेवून असलेल्या ‘स्वराज्य’ची वाटचाल नवीन आणि जुन्या अशा शिलेदारांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे.

स्वराज्य पक्ष सिन्नर मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात असणार असल्याने इतर पक्षातील प्रस्थापित नेत्यांना व कार्यकर्त्यांना याविषयी प्रचंड उत्सुकता आहे. स्वराज्य पक्ष जरतरच्या चर्चात न गुंतता प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापितांना न्याय देण्यासाठी नियुक्त्या जाहीर केल्याचे जिल्हाप्रमुख डॅा.रुपेश नाठे यांनी सांगीतले.आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ‘स्वराज्य’ने आपला दावा दाखल केला आहे.

 

स्वराज्यप्रमुख संभाजीराजे छत्रपती यांचे नाशिकवर विशेष प्रेम असून येत्या विधानसभे मधे नाशीक केंद्रस्थानी असनार आहे.स्वराज्याचे नाशिक मधील संपर्क कार्यालयात शरद शिंदे यांचा स्वराज्य पक्षा मधे प्रवेश करण्यात आला व सरचिटणीस धनंजय जाधव उत्तर महा.प्रमुख केशव गोसावी यांचा मार्गदर्शनात सिन्नर तालुका प्रमुख पदी जिल्हाप्रमुख डॅा.रुपेश नाठे यांनी नियुक्ती केली.

सिन्नर मधील शासकीय योजनांमध्ये असलेल अकार्यक्षम नियोजन बाबत आवाज उठवणे. महिलांसाठी सबलीकरणासाठी वेगवेगळी शिबिर लवकरच आयोजित करण्यात येनार असल्याचे यावेळी नवनिर्वाचीत ता.प्रमुख शरद शिंदे यांनी सांगीतले .तसेच स्वराज्याच्या पंचसूत्री ला प्राधान्याने न्याय देण्यासाठी सर्वच शिलेदार ताकदीने सज्ज आहेत.यावेळी जिल्हाप्रमुख डॅा.रुपेश नाठे , नवनिर्वाचीत तालुका प्रमुख शरद शिंदे,सहसंघटक विजय चुंभळे , युवा ता.प्रमुख समाधान जाधव, शिवाजी गुंजाळ ता.संघटक,संदिप लोंढे शहराध्यक्ष शिवसेना, राजाराम आव्हाड, निलेश चव्हाण ,उपशहर प्रमुख,पुंडलिक बलक शहर संघटक,प्रविण कुलकर्णी सल्लागार.बाळा जाधव व पदाधीकारी.उपस्थित होते

छत्रपती संभाजी राजे यांनी विधानसभा निवडणुक लढवण्याची घोषणा केल्यानंतर , समाजीक व राजकीय श्रेत्रातील कार्यकर्ते त्यांच्या नेत्रुत्वाखाली काम करण्याची इच्छा व्यक्त करताय.छत्रपती शिवाजी महाराजांसह शाहु फुले अंबेडकरांच्या विचराच्या प्रत्येक व्यक्तीचे स्वराज्य पक्षात स्वागत आहे.

~ डॅा.रुपेश हरिश्चंद्र नाठे

जिल्हाप्रमुख स्वराज्य पक्ष

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!