नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेचे डेली कलेक्शन करणाऱ्या …..प्रतिनिधीवर जेल रोड येथे……. बुधवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास चार अज्ञात गुंडांनी केला हल्ला.
सुमारे एक लाख पाच हजार रुपये लुटले….!
लाल दिवा : नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेचे डेली कलेक्शन करणाऱ्या एका अल्पबचत प्रतिनिधीवर जेल रोड येथे बुधवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास चार अज्ञात गुंडांनी हल्ला करून त्याच्या जवळील सुमारे एक लाख पाच हजार रुपये लुटून नेल्याचा प्रकार घडला असून या हल्ल्यात संबंधित अल्पबचत प्रतिनिधी हे गंभीर जखमी झाले आहे.
याबाबतचे वृत्त असे की नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेत गेल्या 32 वर्षापासून जितेंद्र बबनराव लोहारकर वय 51 राहणार शिवराम अपार्टमेंट सुवर्ण हाउसिंग सोसायटी जवळ आर्टिलरी सेंटर रोड नाशिक रोड हे अल्पबचत प्रतिनिधी मधून काम करत आहे बुधवारी दुपारी चार वाजेनंतर नाशिक रोड परिसरातील तसेच जेल रोड व इतर भागातील व्यापाऱ्यांच्या दुकानातील रोज प्रमाणे कलेक्शन करून रात्री पावणे बाराच्या सुमारास जेल रोड येथून बिटको चौक मार्गे घरी जात असताना कोठारी कन्या शाळेजवळ अचानकपणे त्यांच्यापुढे एक दुचाकी गाडी चालक समोर आला त्यानंतर आणखी एका दुचाकी गाडीवर दोघेजण आले एकूण चार जणांनी लोहारकर यांना घेरले. रस्त्यावर कोणी नसल्याचा फायदा घेऊन या चौघांनी लोहारकर यांच्याशी वाद घालून शिवीगाळ सुरू केली त्यानंतर आपल्याकडे असलेल्या धारदार शस्त्राने लोहारकर यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात लोहारकर यांच्या हाताला खांद्याला व पोटावर वार करून गंभीर जखमी केले त्यानंतर या चौघाही लुटारूंनी लोहारकर यांच्या जवळील बॅग मधील कलेक्शन जमा झालेले सुमारे एक लाख पाच हजार रुपये लुटून पलायन केले.
दरम्यान काही वेळानंतर लोहारकर यांनी आपल्या नातेवाईक व सहकार्यांना बोलावून मदत मागितली त्यानंतर लोहारकर यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान या घटने प्रकरणे जितेंद्र लोहारकर यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यात चार अज्ञात गुंडा विरुद्ध तक्रार दाखल केली असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी हे करत आहे.