नाशिक शहर पोलिसांकडून माणुसकीचे दर्शन….. हरवलेल्या चिमुकलीला मिळवून दिले तिचे नातेवाईक… चिमुकलीला बघताच नातेवाईकांच्या डोळ्यात अश्रू अनावर……!
लाल दिवा : आडगाव पोलीस स्टेशन कडील नांदुर नाका पोलीस चौकी हद्दीतील ए टू झेड फर्निचर्स समोर संभाजी रोड, नांदूरगाव शिवार, नाशिक येथुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मधुकर कड, पंचवटी पोलीस ठाणे यांच्या पत्नी नलिनी मधुकर कड नाशिकच्या सायकलीस्ट या पहाटे ०५:३० वाजेच्या सुमारास सायकलवर सायकलिंग करत असताना मिर्ची हॉटेलकडे जात असताना एक १० वर्षाची मुलगी रस्त्याच्या बाजूने रडत अवस्थेत चाललेली दिसली. सदर परीसर हा निर्मनुष्य असल्याने तिच्या जवळ जाऊन त्यांनी तिची चौकशी केली असता, तिला तिचे नाव पत्ता सांगता येत नसल्याने त्यांनी लागलीच पती वरीष्ठ पोलीस निरीक्षक, मधुकर कड, पंचवटी पोलीस ठाणे यांना फोन करून सर्व हकीगत सांगितली. त्यांनी तात्काळ आडगाव पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांना फोन करून सर्व हकीगत सांगितले असता, वरिष्ठांच्या आदेशाने तात्काळ गुन्हे शोध पथकाचे पोलीस उप निरीक्षक प्रविण दाइंगडे, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर कहांडळ, देवराम सुरंजे, निखिल वाघचौरे, अमोल देशमुख, पोलीस दिनेश गुंबाडे, इरफान शेख व महिला ताई वर्षे हे तात्काळ घटनास्थळी जाऊन सदर मुलीला घेऊन नांदुर नाका परिसरात तिच्या नातेवाईकाचा शोध घेतला असता तिला काही एक उपयुक्त माहिती सांगता येत नसल्याने तिला आडगाव पोलीस स्टेशनला आणून पोलीस ठाणे अंमलदार सपोउनि ए. के. गायकवाड व हजर पाळी कर्तव्यावरील महिला पोलिस अंमलदार मनिषा सानप यांच्या ताब्यात दिली. त्यावेळी मनिषा सानप, महिला पोलीस ताई वर्षे यांनी सदर मुलीकडे तपासाचे कौशल्य वापरून तिची चौकशी केली असता सदर मुलीचे नाव तिने श्रावणी दिलीप तुपे मु. पो. जळगाव खु॥, असे सांगितल्याने पोलिस हवालदार ज्ञानेश्वर कहांडळ यांनी जळगाव खु॥ ता. नांदगाव, जि नाशिकचे पोलीस पाटील रविद्र सरोदे यांचे कडे सदर मुलीची चौकशी केली असता तिचे नातेवाईक काका जितेंद्र सरोदे रा. जळगाव खुर्द, ता. नांदगाव, जिल्हा नाशिक यांचा मोबाईल नंबर घेवुन त्यांच्या मोबाईल क्रमांक ७७०९७६०९२३ या क्रमांकावर संपर्क साधून सदर मुलीची अधिक चौकशी केली असता सदर मुलीचे वर्णन व फोटो त्यांना पाठवून ती माझी भाची आहे असे सांगितल्याने त्यांनी मुलीची आत्या संगीता संतोष काजळकर रा. नांदूर नाका, वृंदावन नगर, मनपा मराठी शाळेसमोर, नांदूरगाव, नाशिक यांचा मोबाईल क्रमांक देऊन त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना पोलीस ठाणेस बोलवले असता, सदर मुलगी ही त्यांची भाचीच असल्याचे व ती दोन दिवसांपुर्वी नाशिक येथे आलेली असुन तिला नाशिकची काहीएक माहीती नाही असे तपासात निष्पन्न झाल्याने सदर मुलीचे नातेवाईकांचे पूर्ण चौकशी करून सदर मुलीला आत्या संगीता संतोष काजळकर व चुलते वसंत रामराव तुपे रा. गीत गुंजन हाऊसिंग सोसायटी, झंकार हॉटेल समोर, गंजमाळ, भद्रकाली, नाशिक मोबाईल क्रमांक ९४०३३३२७७६ यांच्या ताब्यात दिले आहे.
सदरची उल्लेखणीय कामगीरी पोलीस आयुक्त, संदिप कर्णिक, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०१, किरणकुमार चव्हाण, मा. सहा. पोलीस आयुक्त, पंचवटी विभाग नितीन जाधव यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, पंचवटी पोलीस ठाणे, वरिष्ठ पोलीस निरिक्षक प्रविण चव्हाण, गुन्हे शोध पथकाचे पोउनि/प्रविण दाइंगडे, सपोउनि ए गायकवाड, देवराम सुरंजे, ज्ञानेश्वर कहांडळ, शिवाजी आव्हाड, दिनेश गुंबाडे, निखिल वाघचौरे, इरफान शेख, अमोल देशमुख, मनिषा सानप, महिला पोलीस ताई वर्षे अशांनी केली .