साखरपुड्याला गेले अन् नवरीच घेऊन परतले ; खालकर व मोगल परिवाराचा आदर्शवत सोहळा…!

ना लग्नपत्रिका, ना वरमाईचा मानपान, ना बॅन्डबाजा, लग्नकार्यातील या सर्व अनावश्यक खर्चाला फाटा देत वधू-वर पक्षाला लग्नात मोठा खर्च करता येणे शक्य असताना दोन्ही परिवार, वधू-वराच्या आग्रहाने साध्या पद्धतीने लग्न उरकून घेण्याचा प्रस्ताव मध्यस्थांनी मांडताच वैभव व श्वेता यांच्या सातजन्माच्या गाठी बांधल्या गेल्या.

 

भेंडाळी (ता. निफाड) येथील प्रसिद्ध उद्योजक सुदाम राजे खालकर यांचा मुलगा वैभव आणि कोठुरे (ता. निफाड) येथील शिवाजी मोगल यांची मुलगी श्वेता यांची वधू-वर पसंती होऊन साखरपुडा पार पडला. त्याचवेळी नातेवाईक व मध्यस्थी मंडळी जमा झाली आणि लग्नाच्या पुढील तयारीची चर्चा सुरू असताच काही सुशिक्षित मध्यस्थी यांनी अनावश्यक खर्चाला फाटा देत हे लग्न आताच उरकून घ्यावे, असा प्रस्ताव मांडताच खालकर व मोगल यांच्यासह वधू आणि वराने देखील होकार दिला.

 

त्यानंतर अवघ्या काही वेळेतच ना मानपान, ना रुसवे-फुगवे, शिवाय साधेपणाने कोठूर येथे वैभव व श्वेता यांचा विवाह सोहळा पार पडला. साखरपुड्याला गेलेले खालकर परिवार नवरी घेऊनच भेंडाळी मध्ये आल्याने गावात अनेकांना सुखद धक्का बसला.

What’s your Reaction?
+1
1
+1
2
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
2
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!