पोलीसांच्या तणाव निवारणासाठी “मोरूची मावशी ” नाटकाचा विशेष प्रयोग…..!
लाल दिवा : नाशिक शहर पोलीसांच्या दैनंदिन कर्तव्या व्यतीरीक्त लोकसभा-२०२४ ची निवडणुक निर्वीवादपणे पार पाडावी तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यस्था राखतांना बंदोबस्तामध्ये झालेली वाढ व निवडणुक विषयक विविध कामांमुळे पोलीस अधिकारीअंमलदार यांच्यामध्ये अतिरीक्त ताण-तणाव निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरुन संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांच्या संकल्पनेतुन दर महिन्याला ताण-तणाव कमी करण्याकरीता विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते .
पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यातील ताणतणावाचे व्यवस्थापन होवुन कामात अधिक उत्साह व आनंद निर्माण व्हावा म्हणुन संदिप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी अमित रत्नाकर कुलकर्णी यांचे एकदंत फिल्मसच्या सहयोगातुन पोलीस अधिकारी/अंमलदार व त्यांचे कुटुंबीय यांचेसाठी दिनांक ०६/०५/२०२४ रोजी सायंकाळी ०६:०० ते ०९:०० या वेळेत कालीदास कलामंदिर येथे नाटय व फिल्म कलाकार भरत जाधव यांची प्रमुख भुमीका असलेला “मोरूची मावशी” या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
आयोजीत केलेल्या कार्यक्रमासाठी सर्व शासकीय विभागांचे प्रतिनीधी, वृत्तप्रत्रांचे संपादक, इलेक्ट्रोनिक व प्रिंट मिडीयाचे प्रतिनीधी उपस्थीत राहुन शुभेच्छा देणार आहेत.
सदर कार्यक्रमामध्ये संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त नाशिक शहर, प्रशांत बच्छाव, पोलीस उपआयुक्त (गुन्हे), किरणकुमार चव्हाण, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-१, मोनिका राउत, परिमंडळ-२, चंद्रकांत खांडवी, पोलीस उपआयुक्त (मुख्यालय) सर्व सहा. पोलीस आयुक्त, सर्व पोलीस अधिकारी, सर्व पोलीस अंमलदार हे सहकुटुंब हजर राहुन कार्यक्रमाचा आस्वाद घेवुन मनमुराद आनंद वृद्धींगत करणार आहेत.