अवैध देशी विदेशी दारू वाहतूक करतांना अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलिसांचा छापा, ६३ हजारांची दारू जप्त…..!
लाल दिवा-नाशिक,ता.१४:-संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी पोलीस आयुक्तालयात अवैध धंदयाविरूध्द कारवाई करणे बाबत आदेशित केले आहे.
त्या अनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी पथकातील पो. हवा. देवकिसन गायकर यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत अशोका हॉस्पीटल समोर, वडाळा रोड, नाशिक येथे मारूती इको कार क. एम. एच. १५/ जे. एम. २६५६ मध्ये देशी व विदेशी दारूची वाहतुक होत असल्याची माहीती मिळाली होती.
पथकातील अधिकारी अंमलदार यांनी मिळालेल्या बातमीची खात्री करून कारवाई करणे करीता (दि.१३) मार्च २४ रोजी ११:५५ वाजेचे सुमारास अशोका मेडीकेअर हॉस्पीटल समोर, श्री संत सावता माळी मार्ग, इंदिरानगर, नाशिक येथे रोडवर सापळा लावुन इसम रोहीदास रघुनाथ पगारे, वय ५० वर्षे, व्यवसाय चालक, रा. बंगला नंबर ७, अभिषेक पार्क, सुयोग नगर, चंपा नगरी, कॅनल रोड, जेल रोड, नाशिक यास ताब्यात घेतले. नमुद इसमाने स्वतःचे फायद्यासाठी विनापरवाना देशी व विदेशी दारू वाहतुक करतांना मिळुन आल्याने त्यास ६३६६०रू कि.चा देशी विदेशी दारू व ३,००,०००/-रू किंमतीची मारूती इको कार क. एम. एच. १५/ जे. एम. २६५६ असा एकुण ३,६३,६६० रू किंमतीच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. नमुद इसमाच्या विरोधात इंदिरानगर पो. स्टे. येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त नाशिक शहर, प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, सिताराम कोल्हे सपोआ, गुन्हे, वपोनि. जयराम पायगुडे, अंमली पदार्थ विरोधी पथक यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि. हेमंत नागरे, पोउनि. मुक्तेशवर लाड, श्रेपोउनि. दिलीप सगळे, पोहवा. संजय ताजणे, पोहवा. देवकिसन गायकर, पोना. योगेश चव्हाण, पोना. बळवंत कोल्हे, पोअं. गणेश वडजे यांनी केलेली