भाजपने पुन्हा एकदा लावले खा. हेमंत गोडसे यांचे लाईट…….. खा. श्रीकांत शिंदे हे ऑथेंटिक नाहीत… भाजपाचा दावा….!
लाल दिवा-नाशिक,ता.१३ :- महायुतीचे जागा वाटपाचा फॅार्म्यूला अद्याप ठरलेले नसतांना नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिक लोकसभा मतदार संघातील उमेदवाराची घोषणा केल्यानंतर त्यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमरावती येथे पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनी काल नाशिकमधून हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर केली. त्याबद्दल प्रश्न विचारला. त्यावर दरेकर म्हणाले की, श्रीकांत शिंदे हे ऑथेरिटी नाहीत, एकवेळ एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले असते तर आपल्याशी बोललो असतो. तिन्ही पक्षाच्या सुसंवादातून एकत्र निवडणूक होईल. कुठेही विसंवाद होणार नाही. ज्या जागा त्यांना वाटतात, त्या जागा ते मागतायत, ज्या जागा योग्य असतील त्या त्यांना मिळतील.
नाशिकमध्ये मंगळवारी आयोजित झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात श्रीकांत शिंदे यांनी थेट विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनाच तिस-यांदा लोकसभेत पाठवायचे आहे असे सांगितले होते. त्यानंतर त्यावर आता प्रतिक्रिया येवू लागल्या आहेत. या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात श्रीकांत शिंदे म्हणाले प्रभू रामाचा धनुष्यबाण नाशिकमध्येच राहणार, हेमंत गोडसे यांना तिसऱ्यांदा लोकसभेत बहुमताने पाठवायचं आहे असे सांगत उमेदवारी जाहीर केली होती.
गेल्या काही दिवसांपासून नाशिक लोकसभा मतदार संघ भाजपसाठी सोडणार असल्याची चर्चा सुरु झाल्यामुळे खा. शिंदे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे गोडसे यांना मात्र दिलासा मिळाला होता. मात्र आज प्रवीण दरेकर यांनी त्यावर प्रतिक्रिया देत श्रीकांत शिंदे हे ऑथेरिटी नाहीत असे सांगत गोडसे समर्थकांचा हिरमोड केला