महिला दिनाचे औचित्य साधून स्व. ढिकले फाऊडेशनकडून कर्तबगार महिलांचा सत्कार. ; पंचवटी – स्व. उत्तमरावजी ढिकले स्पोर्ट्स फाऊंडेशन आयोजित कर्तबगार महिला पुरस्कार 2024 वितरण सोहळा उत्साहात संपन्न…. !
लाल दिवा-नाशिक,ता.१२ :- स्व. उत्तमरावजी ढिकले स्पोर्ट्स फाउंडेशन व दुधारे स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त कर्तबगार महिला पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी नाशिक पूर्वचे आमदार अँड राहुल ढिकले, नाशिक ए. सो. चे सरचिटणीस श्री राजेंद्र निकम, शिवछत्रपती पुरस्कार विजेते अशोक दुधारे, आनंद खरे, राजू शिंदे, पाटबंधारे कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन शशिकांत मोरे, ग्राहक मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदार, जिल्हा पुरस्कार विजेते नितीन हिंगमिरे, शशांक वझे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अशोक कदम, क्रीडा जिल्हाध्यक्ष दीपक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
नाशिक शहरातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या व आपल्या क्षेत्रात आपल्या कामाबरोबरच समाज हितोपयोगी कार्य करणाऱ्या समाज उपयोगी कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील महिला कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ता, व्यवसायिक, शिक्षिका, आदींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले नाशिक पूर्व विभाग मतदार संघातील नाशिकरोड, आडगाव, मखमलाबाद, पंचवटी, पेठ रोड, परिसरातील महिलांची निवड या कार्यक्रमासाठी पुरस्कारार्थी म्हणून करण्यात आली होती, सदर कार्यक्रमाचे आयोजन स्व. उत्तमरावजी ढिकले स्पोर्ट्स फाउंडेशनचे सरचिटणीस दीपक निकम व खजिनदार ज्योती निकम यांनी केले होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी कुणाल अहिरे, आनंद चकोर, मनीषा काठे, अविनाश वाघ, महेंद्र साळवे, सतीश बोरा, शैलेश रकिबे, ऋषिकेश रसाळ, सुरेखा दिवेकर, मंजिरी पाटे, कल्याणी शेवाळे, हर्षदा नाईक आदींनी परिश्रम घेतले.