पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने ॲक्शन मोडवर…….मातोरीतील सराईत गुन्हेगार रोशन लोखंडे याच्या तडीपारीचे आदेश ….!
लाल दिवा-नाशिक,ता.६ :- सराईत गुन्हेगार रोशन दिनकर लोखंडे रा. मातोरी ता. जि. नाशिक यांचे विरुध्द शरीरा विरुध्द नाशिक तालुका पोलीस स्टेशन व म्हसरुळ पोलीस स्टेशन नाशिक शहर येथे पाच, खुनाचा प्रयत्न दुखापत, आर्म अॅक्ट सदरा खाली दाखल होते. त्यांची मातोरी व मखमलाबाद नाशिक परिसरात खुप दशहशत होती म्हणुन त्यांचे विरुध्द मा. उपविभागीय दंडाधिकारी नाशिक उपविभाग यांचे कडेस मुंबई पोलीस कायदा कलम १९५१ चे कलम ५६ (१) (२) अन्वये नाशिक जिल्हयातुन हददपार करणे बाबत प्रस्ताव पाठविलेला आहे. त्या प्रमाणे मा. उपविभागीय दंडाधिकारी नाशिक उपविभाग नाशिक, रोशन दिनकर लोखंडे रा. मातोरी ता. जि. नाशिक यास ८ महीन्यासाठी नाशिक जिल्हयातुन हद्दपारीचा आदेश झाला होता त्या आदेशा प्रमाणे रोशन दिनकर लोखंडे यास हद्दपारीची नोटीस बजावणी करुन नाशिक जिल्हयाबाहेर पाठविण्यात आलेले आहे. तरी सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधिक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी नितिनकुमार गोकावे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सत्यजीत आमले, पोलीस हवालदार एन. आर. वाघ, रविंद्र गांगोडे यांनी केलेली आहे.