श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त……नगरसेवक मुकेश शहाणे यांचा जलवा…… दैदिप्यमान मिरवणुकीने भक्तगण प्रसन्न….!
लाल दिवा : श्री गजानन महाराज देवस्थान, नवीन नाशिक आयोजित माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांनी ना भूतो न भविष्य अशी मिरवणूक होईल अशी मिरवणूक नवीन नाशिक मध्ये आयोजित केलेली हजारोंच्या संख्येने भाविक या मिरवणुकीला उपस्थित होते.
या मिरवणुकीचे विशेष म्हणजे घोडे, उंट, लाइट्स दोन प्रकरचे ढोल पथक, साऊंड सिस्टीम , बग्गी, बैलगाडी, रथ व तसेच मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण मनुष्यरुपी प्रतिकृती श्री गजानन महाराज, श्री स्वामी समर्थ महाराज, श्री साई बाबा, अघोरी नृत्य त्यात विराट महादेव, नंदिवर विराजमान कालभैरव,विराट असे राम, सीता, लक्ष्मण, विराट हनुमान, वानर सेना, आदिवासी नृत्य, व भजनी मंडळ असे सर्व कलाकारांनी मिरवणुकीचे रंग भरून टाकले होते. सपूर्ण नवीन नाशिक मध्ये त्याचे वारे वाहत होते. तसेच मिरवणुकीला असंख्य व सर्व पक्षीय मान्यवरांनी हजेरी लावलेली लावलेली त्यात नाशिकचे खा. हेमंत गोडसे, भाजपा शहराध्यक्ष प्रशांत जाधव, लक्ष्मण सावजी, केदा अहेर, माजी नाशिक देवळा काँटामेट बोर्ड अध्यक्ष सचिन ठाकरे, आनंद भाऊ सोनवणे,कैलास अहेर, सतीश सोनवणे, रवी पाटील, छाया देवांग, निलेश ठाकरे, तुळशीराम भागवत, हर्षदा फिसोदिया, सोनाली ठाकरे, पवन कातकाडे, योगेश पाटील, अमोल शेळके,भूषण कदम,गौरव केदार, सुबोध नागपुरे, मुकेश शेवाळे, गोटू सनाप,प्रदीप चव्हाण, गणू लोखंडे,हेमराज, महेश पाटील,अंकुश वरडे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिक पुराणिक गुरुजी, दिलीप पाटील, शिवाजी सांगळे, रामराव भेंडाळे, डॉ. रुपेश उभाळे, अनिकेत कुमावत, हितेश महाले, सुजित आवारे, चैतन्य ठाकरे, विशाल गवांदे आदींनी आपली उपस्थिती दर्शवली. पुढील तीन दिवस प्राणप्रतिष्ठा महापूजा होणार असून गजानन महाराज प्रकट दिनी मूर्ती स्थापना सोहळा तसेच भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. भाजपा नगरसेवक मुकेश शहाणे यांनी सर्व परिसरातील नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती केली आहे.
फोटो ओळी
सिडको : मुकेश शहाणे आयोजित गजानन महाराज मिरवणूक विहंगम दृश्य