नागरिकांनो कृपया कोणत्याही टिप्स किंवा संशयित ड्रग्स संबंधित टिप्स शेअर करा……..आम्ही पडताळणी करू आणि कारवाई करू…..!

लाल दिवा : शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर रेकॉर्ड वरील गुन्हेगार तसेच भारतीय हत्यार कायदयान्वये गुन्हे दाखल असलेले गुन्हेगार, अवैध दारू विक्री करणारे इसम, गुन्हयात फरारी आरोपीतांना अटक करणे, टवाळखोरांवर कारवाई, इत्यादी करीता परिमंडळ-२ च्या वतीने कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यांत आले.

सदरचे कोम्बिंग ऑपरेशन करीता  मोनिका राऊत, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-२, शेखर देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त, अंबड विभाग व डॉ. सचिन बारी, सहाय्यक पोलीस आयुक्त, नाशिकरोड विभाग यांनी पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करुन परिणामकारक कोम्बिगं miroir terzo nfl jersey sales nike air max aliexpress tapis de reception gonflable raptor ipad 2019 hülle mit tastatur und stifthalter golf d tp link remote control plavky chlapec 128nove sbloccare oblo lavatrice ariston cheap jordan 4 adidas yeezy 700 v3 nike wiki brandon aiyuk jersey miroir terzo polaroid κάμερα परेशन कारवाई केली आहे

रेकॉर्डवरील शरिरा विरुध्दचे १०४ गुन्हेगारांना बोलावून चौकशीफॉर्म भरुन घेवून आवश्यक ती कारवाई करण्यांत आलेली आहे.

. तडीपार असलेले एकुण १४ गुन्हेगारीची चौकशी करण्यात आली . ६९ टवाळखोरां विरुध्द ११२/११७ प्रमाणे कारवाई करण्यात आली

कोटपा कायदयान्वये इंदिरानगर व सातपुर पोस्टे. हद्दीत एकुण १४ केसेस करुन कारवाई करप्यांत आले आहे..

. दारुबंदी कायदयान्वये इंदिरानगर व देवळालीकॅम्प पोस्टे हद्दीत चोरुनलपून अवैधरित्या देशी, विदेशी दारु बॉटल्स्चा साठा करुन विक्री करणारे ०२ इसमां विरुध्द कारवाई करुन २८८५/- रुपयाचा माल जप्त करण्यांत आला आहे.

समन्स/वॉरंट मधील इसमांना चेक करुन १३ इसमांना समन्स तसेच ०३ इसमांना वॉरंट बजावण्यात आले आहे

. अंबड व सातपुर पोस्टे हद्दीत १६ हॉटेल्स्, लॉजेस् चेक करण्यांत आली आहे.रेकॉर्ड वरील माला विरुध्द, शरिरा विरुध्दचे गुन्हेगार, तडीपार तसेच घातक हत्यारे, अग्निशस्त्र बाळगून गुन्हे करणारे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करुन दहशत निर्माण करणारे गुन्हेगारांना अचानकपणे कोम्बिंग, ऑलआउट, नाकाबंदी, इत्यादी कारवाईत चेक करुन, घडझडत्या घेवून तसेच डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करुन गंभीर गुन्हे उघडकीस आणून अटक करण्याची कारवाई श्री. संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली नियमित सुरु राहणार असल्याचे श्रीमती मोनिका नं. राऊत, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – २, नाशिक शहर यांनी सांगितले आहे.

 

 

 

  • गुन्हेशाखा युनिट १ च्या वतीने एकाच दिवशी ३ कारवाया

 

गुन्हेशाखा युनिट .१ नाशिक शहर कडील नेमणुकीचे पोहवा/प्रविण वाघमारे यांना गुप्त बातमीदार याचे मार्फतीने बातमी मिळाली की, रेकॉर्ड वरील गुन्हेगार सुमित दयानंद महाले हा फिल्ट्रेशन प्लॅन्टचे जुन्या पाण्याचे टाकीखाली, फुलेनगर नाशिक येथे गावठी बनावटीचे पिस्तोल तसेच जिवंत काडतुसे असे विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशिर बातमी मिळाली होती. सदरची माहीती पोहवा / प्रविण वाघमारे यांनी वपोनि श्री. अनिल शिंदे यांना कळवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि / हेमंत तोडकर, सपोउनि / रविंद्र बागुल, पोहवा/प्रविण वाघमारे, प्रदिप म्हसदे, विशाल काठे, संदिप भांड, नाझीमखान पठाण, अशांनी फिल्ट्रेशन प्लॅन्टचे जुन्या पाण्याचे टाकीखाली, फुलेनगर नाशिक येथे सदर इसमास शिताफीने पकडून ताब्यात घेतले. त्याचेकडुन ३०,०००/- रुपये कि.वे देशी बनावटीचे पिस्तोल, ०२ जिवंत काडतुसे १०००/-रूपये कि.चे असा एकुण ३१,०००/-रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून आरोपी विरूध्द पंचवटी पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे

 

 

  • ३ गुन्हेगारांना, पोलीस उप आयुक्त, मोनिका राऊत यांनी केली हद्दपारीची कारवाई…

 

पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी, सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होईल असे गुन्हेगारी कृत्य व गुन्हे करून जनजीवन विस्कळीत करणा-या इसमांची माहिती काढून महाराष्ट्र पोलीस कायदयान्वये हद्दपारीची कारावाई करणेबाबत आदेश दिले होते

 

त्यानुसार चुंचाळे पोलीस चौकी हद्दीतील आदीत्य देवानंद पांडे, वैभव उर्फ बाळा अशोक राजगिरे, . यांनी चुंचाळे पोलीस चौकी हद्दीत व चुंचाळे परिसरात हदशत कायम रहावी यासाठी त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना जिवेठार मारण्याचा प्रयत्न करणे, दरोडा टाकण्याच्या तयारीत असतांना मिळून येणे, बेकायदेशीरपणे घातक शस्त्र जवळ बाळगणे, चोरी करणे, घरफोडी चोरी करणे, असे गंभीर गुन्हे दाखल असून, नागरिकांच्या मनात भिती आणि दहशतीचे वातावरण निर्माण केले होते

 

त्याचप्रमाणे देवळाली कॅम्प पोलीस चौकी हद्दीतील दिपक चिंतामण भालेराव, देवळाली याने देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीत दहशत निर्माण रहावी यासाठी त्याने गैरकायदयाची मंडळी जमवून घातक हत्याराने गंभीर दुखापत करणे, मारहाण करणे, असे गंभीर गुन्हे दाखल असून नागरिकांच्या मनात भिती आणि दहशतीचे वातावरण निर्माण केले होते या

 

गुन्हेगारांनी नाशिक शहरात सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होईल असे गुन्हेगारी कृत्य व गुन्हे करून जनजीवन विस्कळीत केल्याने त्यांचे विरूध्द श्री. संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांचे मार्गदर्शना खाली, श्रीमती मोनिका नं. राऊत पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – २, नाशिक शहर तसेच श्री. शेखर देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त, अंबड विभाग व श्री. सचिन बारी, सहाय्यक पोलीस आयुक्त, नाशिकरोड विभाग यांनी नमुद इसमां विरुध्द हद्दपारीची कारवाई करून नाशिक जिल्हयाबाहेर घालविले आहे….

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!