रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना हत्यारासह अटक .. पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांच्या विशेष पथकाची कारवाई…… पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी गुन्हेगारांवर जरब बसविण्यासाठी विशेष मोहीम….
लाल दिवा : पोलीस आयुक्तालयात विशेष पथकाची स्थापना करून कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत.
त्या अनुषंगाने विशेष पथकातील अंमलदार पो.ना. ९११ दत्तात्रेय चकोर यांना गुप्त बातमीदार यांचे मार्फतीने एक इसम बोरगड, नशिक येथे कोयते विक्री करीता घेवुन येणार असल्याची खात्रीशिर बातमी मिळालेली होती. विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी दि. ०५/०२/२०२४ रोजी १८.३० वाजता म्हसोबा वाडीकडुन म्हसरूळकडे जाणारे रोडवर कॅनलच्या पुलावर, बोरगड, म्हसरूळ, नाशिक येथे सापळा लावुन इसम नामे १) हर्षल सुनिल वनवे, वय २० वर्षे, रा. फ्लॅट नंबर १२, तारांगण सोसायटी, म्हसरूळ लिंक रोड, नाशिक, २) सतिष बाळु भांगरे, वय १८ वर्षे, ४ महिने, रा. फडोळ गल्ली, मखमलाबाद, नाशिक यांना सिताफिने ताब्यात घेवुन त्यांचे कब्जातुन विनापरवाना बेकायदेशिर रित्या विक्री करण्याच्या उददेशने कोयते बाळगतांना मिळुन आले.
त्यांचेकडुन दोन कोयते व मोटार सायकल असा एकुण १,१०,६००/- रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यातील दोन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन आरोपी क. १) हर्षल सुनिल वनवे यास नाशिक शहरातुन हद्दपार केले आहे.
सदरची कामगीरी मा.श्री. संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त साो. नाशिक, मा.श्री. प्रशांत बच्छाव, पोलीसः उप आयुक्त साो. गुन्हे, मा.श्री. डॉ. सिताराम कोल्हे, सपोआ गुन्हे, नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील वपोनि. पंकज भालेराव, सपोनि. प्रविण सुर्यवंशी, सपोनि. हेमंत नागरे, सपोनि. किरण रोंदळे, सपोनि. हेमंत फड, पो. हवा. किशोर रोकडे, पो. हवा. भारत डंबाळे, पो.ना. योगेश चव्हाण, दत्तात्रेय चकोर, सुनिल कोल्हे, भुषण सोनवणे, पो. अंमलदार विठ्ठल चव्हाण, अविनाश फुलपगारे, गणेश वडजे यांनी केलेली आहे.