पीडित महिलेच्या न्याय व हक्कासाठी सामजिक कार्यकर्ते गजू घोडके यांचा उपोषणाचा कडक इशारा ….!
लाल दिवा-नाशिक,ता.५ : -नाशिकचे सामाजिक कार्यकर्ते गजू घोडके यांनी दिलेल्या निवेदनाचा आशय पुढील प्रमाणे, भारतीय संस्कृतीमध्ये स्त्री जातीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. स्त्रीयांना आपण नेहमीच देवीचा दर्जा दिलेला आहे. स्त्रीयावर जेव्हा जेव्हा अन्याय अत्याचार होतो. तेव्हा तेव्हा त्यांना घटनेप्रमाणे संरक्षण दिले जाते. अन्याय करणाऱ्या विरोधात तक्रार दाखल करून त्याला कठोर शासन केले जाते. हा लोकशाहीतील जन्मसिद्ध अधिकार आहे. असे असताना एका पिडीत महिलेने त्यांच्यावर झालेल्या अन्याय अत्याचार संदर्भात तक्रार अर्ज करूनही त्यांना पाहिजे तो न्याय मिळाला नाही. उलट तिच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करून तसेच अन्य गुन्ह्यांमध्ये आरोपी करून त्यांची मध्यवर्ती कारागृहामध्ये रवाना करण्यात आली. आजही त्यांची सुटका होणे अशक्यप्राय बाब झाली आहे. असे असताना एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी या गोष्टीला वाचा फोडत असून तिला न्याय मिळेल अशी अपेक्षा करत आहे.
हे करत असताना माझ्या व परिवाराच्या देखील जीवाला धोका आहे. यासंदर्भात मी नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन केले आहे. यापूर्वी मी सदर पिडीत महिलेच्या पालकांकडून यासंदर्भात सविस्तर माहिती जाणून घेतली. त्यानंतर विदारक सत्य हे समोर आले. त्यामुळे त्या महिलेला न्याय मिळालाच पाहिजे. असे माझ्या मनाला कुठेतरी वाटले म्हणून मी या गोष्टीला वाचा फोडत आहे. त्यास न्याय मिळो अथवा न मिळो परंतु ही गोष्ट जनता जनार्दना पर्यंत पोहोचली पाहिजे. आणि नेमक कोण कोणावर अन्याय करतय हे देखील समजलं पाहिजे. हाच या मागचा उद्देश आहे.
महिलांसाठी कायदा आहे. महिलांसाठी महिला आयोग आहे. आपल्या देशाच्या राष्ट्रपती देखील महिला आहेत. पंतप्रधान पद सुद्धा महिलेने भोगलेले आहे. एवढेच नव्हे तर नाशिक मध्ये शहरांमध्ये देखील दोन महिला लोकप्रतिनिधी आमदार म्हणून काम करीत आहेत. प्रशासनात मोठ्या पदावर महिला अधिकारी म्हणून कार्यरत आहे. असे असताना देखील एका अन्याय अत्याचार पीडित महिलेला न्याय मिळू नये. त्यावर कोणी आवाज उठवू नये ही आपल्या लोकशाहीत फार मोठी शोकांतिका आहे. याकरता सर्व समाजाने एकत्र येणे आवश्यक आहे. मग त्याकरता समोरचा विरोधी व्यक्ती कोणीही असो. त्याच्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे. हेच मी या माध्यमातून सांगू इच्छितो.
जय हिंद ! जय महाराष्ट्र !
धन्यवाद
गजू घोडके, सामाजिक कार्यकर्ते
+919822788930