पोलीसांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या सराफाचे नातेवाईक अद्यापही न्यायाच्या प्रतीक्षेत…. कल्याण व उपनगर पोलिसांची दंडेलशाही……!

लाल दिवा : वर्षभरापूर्वी पोलिसांच्या जाचास कंटाळून

आत्महत्या करणाऱ्या नाशिकरोड येथील सुवर्णकार व्यावसायिक दीपक दुसाने याची आत्महत्या होण्यापूर्वीची एक व्हिडीओ क्लिप हाती लागली होती. त्यामुळे या प्रकरणाला कलाटणी मिळाली होती. पोलिसांचे खरे रूप यामुळे आमजनतेला समजले. त्यामुळे या नवीन आणि महत्वपूर्ण पुराव्याच्या आधारे संबंधित पोलिसांवर सी आय डी चौकशी करून कारवाई न झाल्यास आत्मदहनाचा पवित्रा घ्यावा लागेल, असा इशारा त्यावेळी ओबीसी सुवर्णकार समाजाचे प्रदेशाध्यक्ष गजू (भाऊ) घोडके यांनी एका निवेदनाद्वारे दिला होता.

नाशिकसह जिल्ह्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रात सुवर्णकार समाज आणि सराफ व्यावसायिक अत्यंत प्रामाणिकपणे व

सचोटीने आपला सराफी व्यवसाय करीत असतात. परंतु

त्यांना नाहक त्रास देऊन किंवा खोट्यानाट्या केसेसमध्ये

अडकवण्याची भीती दाखवून त्यांच्याकडून खंडणी स्वरूपात पैसे वसूल करण्याचा गोरखधंदा तपास यंत्रणांनी राजरोसपणे अवलंबला. ही वस्तुस्थिती आहे. सराफ व्यावसायिक हा सर्व अन्याय सहन करीत आहे. त्याला कंटाळून काही व्यावसायिक आपले जीवन संपवत असल्याच्या घटनाही घडल्या. काही वर्षांपूर्वी विजय बिरारी या सराफी व्यावसायिकाने परप्रांतीय तसेच स्थानिक पोलिस भगात यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्याचीच पुनरावृत्ती नाशिकरोड येथे झाली होती. जेलरोड येथे दुसानेबंधू ज्वेलर्स नावाने सराफी व्यवसाय करणाऱ्या दीपक दुसाने यांनी चोरीचे सोने विकत घेतले. असा ठपका ठेवून कल्याण व स्थानिक पोलिसांनी त्यांची चौकशी केली. त्यांना धमकावले आणि खोट्यानाट्या केसेसमध्ये अडकविण्याची भीती दाखवून त्यांच्याकडून सुमारे ३ लाख ७० हजार रुपयेखंडणी स्वरूपात उकळल्याचा त्यांच्या नातेवाईकांचा आरोप होता. असे गजु (भाऊ) घोडके यांनी निवेदनात म्हटले आहे.

या प्रकरणात स्थानिक पोलिसांनी दीपक दुसाने यांना सहकार्य करण्याऐवजी त्यांनीही आपले उखळ पांढरे करून घेतल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. या सर्व जाचाच कंटाळून तसेच बदनामीच्या भीतीने दीपक दुसाने यांनी आपल्या राहत्या घरी नायलॉनच्या दोरीने गळफास घेत आत्महत्या केली असा आरोप होता. दीपक यांच्या आत्महत्येस कल्याण पोलीस तसेच नाशिक रोड व उपनगरचे पोलीसही तितकेच जबाबदार असून या संपूर्ण प्रकरणाचे कसून चौकशी व्हावी आणि दीपकच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा अशी मागणी त्यांनी सातत्याने केली होती. याप्रकरणी दोषींवर योग्य कारवाई होत नाही तोपर्यंत दीपकचा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका दीपकचे नातेवाईक यांनी घेतली होती. मात्र मृतदेह ताब्यात न घेतल्यास त्याची परस्पर विल्हेवाट आम्ही लावू अशी भाषा उपनगरचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक माईनकर यांनी वापरल्यानंतर त्याचा सुवर्णकार समाज आणि दुसाने परिवाराने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करून आपल्या भावना शासनापर्यंत पोहोचविल्या होत्या. माईनकर यांची भाषाशैली आणि देहबोली अत्यंत लाजिरवाणी, घृणास्पद आणि चीड आणणारीच होती. त्यामुळे त्यांची तातडीने उचलबांगडी व्हावी या मागणीवर आम्ही आजही ठाम होते. दीपक दुसाने यांच्या बाबतीत जो प्रकार घडला त्याबाबत सराफ व्यावसायिकांमध्ये संतापाची तीव्र लाट होती. पोलिसांच्या दंडेलशाहीच्या निषेधार्थ सराफ व्यवसायिकांनी नाशिक महानगरात बंदची हाक दिली होती आणि त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. याची आठवणही घोडके यांनी निवेदनात करुन दिली आहे.

आता तर आत्महत्या करण्यापूर्वीची दीपक दुसाने याची व्हिडीओ क्लिप उपलब्ध झाल्याने पोलिसांचा खरा चेहरा जगासमोर आला असून या नवीन पुराव्याच्या आधारे तपास करून दीपक यांना आत्महत्या करण्यास खंडणीखोरण पोलिसच सर्वस्वी जबाबदार असल्याचे स्पष्ट होत असून हे प्रकरण सीआयडीकडे सोपवावे, अशी आमची आग्रही मागणी असल्याचेही घोडके यांनी निवेदनात शेवटी नमूद केली होती.

भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष आणि सुवर्णकार समाजाच्या नेत्या चित्राताई वाघ यांनी या प्रकरणी जातीने लक्ष घालून आत्महत्याग्रस्त दीपक दुसानेंच्या कुटुंबीयास न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. गजुभाऊ यांनी त्यांचे आभार मानले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशकात आले असता त्यांनाही याप्रकरणी निवेदन देण्यात आले. त्यामुळे लवकरच या संपूर्ण प्रकरणाच्या तपासला गती मिळण्याची शक्यता वर्तविली जात होती. परंतु एक वर्ष होऊनही दुसाने परिवाराला अद्यापही न्याय मिळाला नाही. ही एक लोकशाहीतील शोकांतिकाच म्हणावी लागेल.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!