सरकारवाडा पोलिसांनी आपल्या संभाषण कौशल्यातून….. हरवलेला मोबाईल शोधला…. प्रत्येक तक्रारीचा गुन्हाच होऊ शकतो असं नाही…… तर ते वेगळ्या कौशल्यातील ते साध्य करता येतं ….. असाच काहीसा प्रकार सरकारवाडा पोलिसांनी दाखवून दिला आहे….. त्याच सर्वत्र कौतुक होत आहे….!
लाल दिवा : सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीत खाजगी शिकवणीसाठी गेलेली अकरावीतील विद्यार्थिनी ‘ लंच ब्रेक ‘ मध्ये बाहेर गेल्यावर वर्गातच ठेवलेल्या दप्तराचे पिशवीतून मोबाईल दूरध्वनी गायब झाला. बाथरुमसह वर्गात सर्वत्र शोध घेऊन व सर्वांना विचारुनही मोबाईल मिळुन न आल्याने विद्यार्थिनी तीचे आईसह तक्रार देण्यासाठी पोलीस ठाणेस आली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शनानुसार पोलीस अंमलदार निलेश वायंकडे, निलम चव्हाण, संदिप सोनावणे यांनी शिकवणी वर्गात जाऊन संस्थाचालक, विद्यार्थी यांना मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता, वर्गातील 200 विद्यार्थ्यांपैकीच कोणीतरी मोबाईल घेतला असण्याची शक्यता, विद्यार्थ्याकडे मोबाईल मिळुन आल्यास त्याचे भविष्यावर होणारा परिणाम या सर्व गोष्टींची जाणीव करून दिली. त्याचा परिणाम होऊन अज्ञात विद्यार्थ्यांने मोबाईल बाथरूम मधे ठेवला. पो.उप नि. पाटील यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तो वर नमूद अंमलदार यांनी बाथरूममधून शोधुन काढला. समंजसपणा दाखवून विद्यार्थिनी व तिचे पालक यांनी चोरीची तक्रार देण्यास नकार दिला. एक विद्यार्थी ‘ चोर ‘ होता होता राहीला. संस्थाचालक, पालक, विद्यार्थी यांनी पोलीसांचे आभार मानले…