पोलीस आयुक्त ॲक्शन मोडवर : नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या ४२ जणांची तडीपारी ….!

लाल दिवा-नाशिक,ता.७ : येत्या १५ जानेवारीला नाशिक शहरात सर्वत्र मकर संक्रांत सणानिमित्ताने पंतग उडविण्यासाठी नागरीकांमध्ये उत्साह दिसून येत आहे. परंतु, पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पारंपारीक मांजाऐवजी नायलॉन तसेच काचेचा वापर करून तयार करण्यात आलेल्या प्रतिबंधीत मांजाची विक्री काही इसमांकडून केली जात असल्याचे यापुर्वी आढळून आले आहे. पतंग उडवितेवेळी सदर मांजाचे घर्षन होऊन तो तुटतो व तो उंच इमारती, झाडे अन्यथा इतरत्र ठिकाणी अडकतो. अशा तुटलेल्या मांजामुळे पक्षी, प्राणी व मानवी जिवीतास धोका निर्माण होऊन पक्षी, प्राणी, नागरीक, बालके, वयोवृद्ध, महिला वाहनस्वार यांचे जखमी होण्याचे अथवा प्राण गमाविण्याचे घटना घडल्या आहेत. तसेच, अशा प्रकारच्या मांजामुळे शाळकरी मुले व दुचाकीस्वार हे देखील अपघात होऊन जखमी अथवा गतप्राण झालेले आहेत. तुटलेला मांजा विजेच्या तांरामध्ये अडकून काही ठिकाणी आगी देखील लागण्याच्या घटना घडलेल्या आहेत.

या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी मा. श्री. संदिप कर्णिक (भा.पो.से.), पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी कठोर कारवाई करणेबाबत आदेशित केले आहे. त्याअनुषंगाने, मा. श्री. किरणकुमार चव्हाण, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १, नाशिक शहर व मा.श्रीम. मोनिका राऊत, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ २, नाशिक शहर यांचे सुचनेप्रमाणे परिमंडळ १ व २ मधील पंचवटी, सरकारवाडा, अंबड व नाशिकरोड विभागातील नायलॉन तसेच काचेचा वापर करून तयार करण्यात आलेला मांजा विक्री करणाऱ्या एकूण ४२ आरोपीतांवर हद्दपरीची कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी, मा.श्री. नितीन जाधव, सहा. पोलीस आयुक्त, पंचवटी विभाग, नाशिक शहर यांनी ०७ इसमांवर, मा. श्री. डॉ. सिद्धेश्वर धुमाळ, सहा. पोलीस आयुक्त, सरकारवाडा विभाग, नाशिक शहर यांनी २३ इसमांवर, मा. श्री. शेखर देशमुख, सहा. पोलीस आयुक्त, अंबड विभाग, नाशिक शहर यांनी ०६ इसमांवर व मा. श्री. आनंदा वाघ, सहा. पोलीस आयुक्त, नाशिकरोड विभाग, नाशिक शहर यांनी ०६ इसमांवर सदरची कारवाई केली आहे.

  • 1) आडगाव – 03
  1. 2) म्हसरूळ – 02
  • 3) पंचवटी – 02
  • 4) भद्रकाली – 05
  • 5) सरकारवाडा – 08
  • 6) गंगापूर – 05
  • 7) मुंबईनाका – 05
  • 8) सातपुर – 01
  • 9) अंबड – 02
  • 10) इंदिरानगर – 03 
  • 11) उपनगर – 03
  • 12) नाशिकरोड – 02
  • 13) देवळाली कॅम्प – 01

 

  •         एकुण – 42

, मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात कुणीही प्रतिबंधीत नायलॉन अथवा काचेचा वापर करून तयार करण्यात आलेल्या मांजाची विक्री अथवा वापर करू नये असे आवाहन परिमंडळ १ चे पोलीस उप आयुक्त, मा. श्री. किरणकुमार चव्हाण तसेच परिमंडळ २ च्या पोलीस उप आयुक्त, मा. श्रीम. मोनिका राऊत यांनी केले असून प्रतिबंधीत नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या इसमांवर थेट हद्दपारीची कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
2
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!