नवीन वर्षाची दमदार सुरुवात : युनिट दोन चे पोलीस हवालदार गुलाब सोनार यांची धडाकेबाज सुरुवात….. नॉयलान मांजा सह ४६,००० रु चा मुददेमाल केला जप्त ….!
लाल दिवा-नाशिक,या.४ : ४ जानेवारी रोजी पोलिस हवालदार गुलाब प्रभाकर सोनार, गुन्हेशाखा,युनिट-२,नाशिक शहर यांना मिळालेल्या गोपनिय बातमी अन्वये मा. पोलीस आयुक्त सो यांच्या कार्यालयाकडील मनाई क्रमांक कक्ष 10/ विशा/ 11(13)/ नायलॉन मांजा / मनाई आदेश / मनाई आदेश/७०३१/2023 नाशिक शहर दिनांक २३/१२/२०२३ अन्वे दिनांक २६/१२/२०२३ रोजीचे 00:01 वाजता पासून ते दिनांक २३/०१/२०२४ आज पावेतो मनाई आदेश जारी असताना
इसम नामे विशाल विजय मारे वय ३३ वर्ष, रा मु.पो .भगवती देवी आडोशाला, देवळाली कॅम्प, नाशिक याने सदर आदेशाचे उल्लंघन करून त्याचे जवळील मोपेड मो.सा.क्र एम एच १५ ईजे २३९४ हिचे वरून १६०००/ रुपये किमतीचे मोनो काईट नावाचे एकूण नायलॉन मांजाचे २० गट्टू प्रत्येकी किंमत ८०० रुपये हा विक्री करण्याकरीता भागुर बस स्टॅन्ड मागे आडोशाला दे.कॅम्प येथे आला असता त्यास पोउपनि/संदेश पाडवी, सपोउपनि/बाळु शेळके, पोहवा/७८२ गुलाब सोनार, पोहवा/५२८ राजेंद्र घुमरे,पोहवा/१४०० शंकर काळे, पोहवा/१४० विजय वरंदळ यांनी सापळा कारवाई करून ताब्यात घेतले असुन त्याचे कब्जातुन बंदी असलेला नॉयलान मांजा व मोपेड मो.सा असा एकुण ४६,०००/- रू किचा मुददेमाल जप्त करून त्यास जप्त मुददेमालासह पुढील कार्यवाही साठी देवळाली कॅम्प पोलीस ठाणे येथे वर्ग केलेवरून गुरन ०२ /२०२४ भादविक.१८८,३४ सह पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ चे कलम ५, १५ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.