संप अखेर मागे; इंधन पुरवठा होणार सुरळीत…!
लाल दिवा-नाशिक,ता.२:-नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा तसेच ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी संबंधित प्रतिनिधींशी मनमाड येथे चर्चा करत तोडगा काढला असून हा संप मागे घेतला आहे.
नाशिक जिल्ह्यातील मनमाड पानेवडी येथील इंधन प्रकल्पातील टँकर चालकांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे, आज सकाळी पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दूरध्वनीवरून चर्चा करत जिल्हाधिकाऱ्यांना बैठक घेवून तोडगा काढण्याच्या सूचना केल्या होत्या.
भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम, इंडियन ऑइल या इंधन कंपन्यांचा इंधनपुरवठा झाला सुरू, संप मागे घेतल्याने इंधन टंचाईचा सामना करणाऱ्या वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे, यामुळे नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील इंधन परिस्थिती पूर्वपदावर येण्यास मदत होणार आहे.