सराफ बाजार येथुन महिलेची पर्स लांबविणारे चोरटे जेरबंद…… गुन्हे शाखा युनिट-१ ची कामगिरी….!
लाल दिवा-नाशिक,ता.३१ : दि.२३ डिसेंबर रोजी रात्री ०८:०० वाजेच्या सुमारास फुल बाजार महानगरपालिकेचे मुतारीचे समोर, सराफ बाजार नाशिक येथुन खरेदी करण्यासाठी आलेल्या महिलेने बाजुला ठेवलेली पर्स तिचे लक्ष नसतांना मोटार सायकलवर आलेल्या दोन अज्ञात इसमांनी चोरी करून चोरून नेली होती सदर चोरटयांचा फिर्यादी यांनी त्यांचे मोटार सायकलवर सराफ बाजार ते भद्रकाली परिसरात पाठलाग केला होता परंतु गर्दीचा फायदा घेवुन आरोपी पळून गेले होते. त्यावरून फिर्यादी यांनी फिर्याद दिल्याने सरकारवाडा पोलीस स्टेशन कडील। गुरनं ३३६/२०२३ भादविक ३७९, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
फिर्यादी यांनी चोरटयांचा शोध घेत असतांना त्यांना परिसरात कुठलेही सी.सी.टी.व्ही फुटेज मिळुन न आल्याने त्यांनी त्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. सदर अज्ञात आरोपीतांचा शोध घेणेबाबत फिर्यादी यांनी मा. पोलीस आयुक्त सो., संदिप कर्णिक यांची भेट घेतली होती. त्यावरून मा. श्री. संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त सो, नाशिक शहर यांचेकडुन देण्यात आलेल्या सुचनांनुसार मा. श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त, गुन्हेशाखा, नाशिक शहर यांचे आदेशान्वये सदर गुन्हयातील आरोपीतांचा तात्काळ शोध घेवुन त्यांचेवर कारवाई करणे बाबत सुचना दिलेल्या होत्या व त्याप्रमाणे मार्गदर्शन केले होते.
त्या अनुषंगाने अज्ञात आरोपीतांचा गुन्हे शाखा युनिट क. १ चे पथक यांनी तात्काळ घटनास्थळा वरील तसेच आजु बाजूच्या परिसरातील सी. सी. टी. व्ही फुटेजची पाहणी केली व सी.सी.टी.व्हि फुटेजच्या आधारे पोअं/२४५० राजेश राठोड यांनी अज्ञात आरोपी यांचा शोध घेवुन त्यांचे नाव व पत्ता निष्पन्न केले. त्यानंतर पोउनि / चेतन श्रीवंत, पोहवा/७३९ देवीदास ठाकरे, पोअं/२४५० राजेश राठोड, पोअं/२१५४ राहुल पालखेडे, पोअं/२२७३ अमोल कोष्टी, पोअं २२६० जगेश्वर बोरसे अशांनी सदर ठिकाणी आलेल्या इसमांना शिताफीने पकडुन ताब्यात घेतले. सदर इसमांना त्यांचे नावे विचारता त्यांनी त्यांचे नावे १) मोहम्मद नाशर सैय्यद, वय-१९ वर्षे, रा-पाटाच्या जवळ, फुलेनगर पंचवटी नाशिक, २) अफजल शब्बीर सैय्यद, वय- १८ वर्षे, रा- पाटाच्या जवळ, फुलेनगर पंचवटी नाशिक असे सांगीतले. त्यास वरील गुन्हयाबाबत विचारपुस करता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली, त्यांच्याकडून चोरी करतांना वापरण्यात आलेली मोटार सायकल व रोख रक्कम असा एकूण ९३,०००/- रू किंमतीचा मुददेमाल हस्तगत केला व आरोपी यांना पुढील कारवाईकामी सरकारवाडा पो. स्टे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरचा गुन्हा हा गुन्हेशाखा युनिट कमांक १ यांना माहिती मिळाल्यानंतर एक दिवसाचे आत उघडकीस आणल्याबद्दल फिर्यादी यांनी गुन्हेशाखा युनिट कमांक १ कार्यालय येथे येवुन मा. पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णीक साो., मा. श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त, गुन्हेशाखा, नाशिक शहर तसेच गुन्हेशाखा युनिट कमांक १ चे अधिकारी व अंमलदार यांचे आभार मानले.