पोलीस आयुक्तांनी घेतली जीव रक्षकाच्या कार्याची दखल ….. दारणा धरणाच्या बॅक वाटर मध्ये जात…… पाणबुडीच्या साह्याने तब्बल अर्धातास शोध घेत ……. पैशाची बॅग व कोयता हस्तगत केल्या प्रकरणी जिवरक्षकाचा प्रशस्ती पत्र देऊन केला गौरव….!
लाल दिवा-नाशिक,ता.२९ : उपनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिष्टर नंबर 469/2023 भा.द.वि.क. 394, 34 प्रमाणे या गुन्ह्यातील आरोपी चंद्रकात विजय काकडे वय 24 वर्षे, धंदा मजुरी, राह. काकडे गल्ली, रोकडोबावाडी, देवळाली गाव, नाशिक रोड, नाशिक याने दिनांक 18/12/2023 रोजी 22.15 वा. चे सुमारास साई लॉन्ससमोर, हांडोरे मळा, विहीतगांव शिवार, नाशिक येथे रस्त्याने जात असेलेला जखमी साक्षिदार प्रकाश बन्सी मरसाळे, वय 41 – वर्षे राह. विहीतगाव ता. जि. नाशिक याचे डोक्यावर कोयत्याने वार करुन त्याचे हातातील 1,68,000/- रुपये बॅग हिसकावुन जबरी चोरी केली. चोरी केलेले बॅगेतील पैसे काढुन सदरची बॅग व कोयता नदीचे पुलावरुन दारणा डॅमच्या बॅक वाटर मध्ये फेकुन दिल्या होत्या.
उपनगर पोलीस स्टेशनच्या पोलीसांचे तोंडी विनंतीला मान देऊन तपासी अमलदार सपोनि महाजन यांचे सोबत जाऊन सदरच्या गुन्ह्यातील वस्तु याचा दारणा नदीच्या डॅमच्या बैंक वाटर मध्ये पाणबुडीच्या साह्याने उतरुन खोल पाण्यात तळास जाऊन अर्धातास शोध घेऊन पोलीस विभागास मदत केली. आपले हे कार्य कौतुकास्पद व प्रशंसास्पद आहे.
या निस्वार्थी व मानवतेच्या भावनेतुन केलेले कामाचे आदर करत. भविष्यात अशीच कामगिरी घडो अशी भावना व्यक्त करत उपनगर येथील पोलीसांकडुन उत्कृष्ठ कामगिरी करीता प्रशस्ती पत्रक देण्यात येत आले..