नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या धडाकेबाज कामगिरीने नागरिकांमध्ये समाधान……..नियंत्रण कक्ष, डायल ११२, पोलिस ठाणे, निर्भया पथक, दामिनी मार्शल्स पथक सज्ज…..!

लाल दिवा-नाशिक,ता.२६ : नाशिक शहर पोलिस आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नागरिक केंद्रीत पोलिसिंगवर भर दिला असून, त्यामध्ये आता ‘सुरक्षित नाशिक’ या संकल्पनेवर भर दिला आहे. यामुळे नाशिककरांना ‘सुरक्षित नाशिक’चा अनुभव घेता येणार आहे.

 

नाशिकमध्ये २५१ व्या कार्यशाळेचा टप्पा नुकताच झाला. त्यामध्ये पोलिसांना ‘सॉफ्ट स्किल ट्रेनिंग देण्यात आले. या स्वरूपाचे प्रशिक्षण पुढील टप्यातही सुरू ठेवत नागरिक केंद्रीत

पोलिसिंग अधिक सुरक्षित व सुलभ करणार आहे. थेट नागरिकांशी संबंधित कार्यवाहीत पोलिस पथकांना अनेक अनुभव येतात. ते जाणून घेऊन कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडवितानाच, त्यांना संभाषण कौशल्याची जाणीव करून देणे महत्त्वाचे ठरते. त्यानुसार प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे, असे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितले.

नाशिक शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी विशेष मोहिमा राबविल्या जात आहेत. गेल्या काही दिवसातच गुन्हेगारीवर मोठ्या प्रमाणात वचक बसला आहे. नाशिक शहरामधील गुन्हेगारी कमी होऊ लागल्यामुळे नाशिककर पोलिस आयुक्तांचे आभार मानत आहेत.

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिक शहराचा आढावा घेतला आणि कारवाया सुरू केल्या आहेत. नाशिक शहर सुरक्षित कसे करता येईल, याकडे ते लक्ष देत आहेत. रस्त्यांवर बसलेल्या टवाळखोरांपासून ते ठिकठिकाणचे बॅनर काढून टाकल्यामुळे शहराचा चेहरा मोहरा बदलताना दिसत आहे.

https://x.com/nashikpolice/status/1739619221779202371?s=20

नाशिक पोलिसांनी गुरुवारी सायकाळी ६ ते ८ वाजे दरम्यान पोलिस आयुक्तालयातील सर्व पोलिस ठाणे कडील तसेच गुन्हेशाखेकडील सर्व युनिट यांनी अंमली पदार्थाचे विक्री/सेवन करणारे रेकॉर्डवरील सराईतांचा शोध घेण्यासाठी तसेच टवाळखोरावर कारवाई करण्यासाठी विशेष पथके तयार करून सर्व पोलिस ठाणे हददीत विशेष मोहिम राबविली.

सदर पथकांनी विशेष मोहिमे दरम्यान परिमंडळ- १ हददीत पंचवटी, आडगाव, म्हसरूळ, भद्रकाली, सरकारवाडा, गंगापूर, मुंबईनाका व गुन्हेशाखा युनिट -१, खंडणी विरोधी व गुंडा विरोधी पथक यांनी सार्वजनीक ठिकाणी उपद्रव करणा-या २०६ जणांविरूध्द व परिमंडळ-२ हददीतील सातपर, अंबड, चुंचाळे चौकी, इंदीरानगर, उपनगर, नाशिकरोड, दे. कॅम्प, गुन्हेशखा युनिट -२, दरोडाशस्त्र विरोधी व अंमली पदार्थ विरोधी पथक यांनी २३६ इसमांविरूध्द अशा एकुण ४४२ इसमांविरूध्द महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ११२/११७ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी राबविलेल्या नाकाबंदी दरम्यान एकुण ३२ वाहनांवर मोटार वाहन कायदयाचे उल्लंघणार्थ १६ हजार दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यापुढे वेळोवेळी विशेष मोहिमा राबवुन कारवाई करण्यात येणार आहे. सदर कारवाई दरम्यान तयार करण्यात आलेल्या विशेष पथकामध्ये गुन्हेशाखेकडील तसेच पोलिस ठाणेकडील पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी सहभाग घेऊन कारवाई केली आहे……..

https://twitter.com/nashikpolice/status/1739619221779202371?t=6DhgYBvSsf6cGhjtR1loJw&s=19

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!