नाशिक शहर व ग्रामीण हददीतून तब्बल १७ मोटार सायकल चोरणारे चोरटे जेरबंद ……पंचवटी पोलीस ठाणे शहर गुन्हेशोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी….!

लाल दिवा-नाशिक,ता.२० : मा. श्री. संदिप कर्णिक साो, पोलीस आयुक्त, नाशिक शहर, मा. श्री. किरणकुमार चव्हाण, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१, नाशिक शहर, मा. श्री. नितीन जाधव, सहा. पोलीस आयुक्त, पंचवटी विभाग, नाशिक शहर यांनी नाशिक शहरातील मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकिस आणणे बाबत आदेशित केले होते.

त्या अनुषगाने पंचवटी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्री. अनिल शिंदे यांनी गुन्हेशोध पथकाचे सहा. पोलीस निरिक्षक/रोहित केदार, सहा. पोलीस निरिक्षक / मिथुन परदेशी व पथक यांना पंचवटी पोलीस ठाणे तसेच नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील मोटर सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत मार्गदर्शक सुचना दिल्या होत्या. दिनांक १४/१२/२०२३ रोजी सायंकाळच्या सुमारास पोहवा /६९२ अनिल गुंबाडे, पोहवा /१६९४ दिपक नाईक,

पोहवा /३९१ कैलास शिंदे, पोना / २५४ निलेश भोईर, पोना/१०२ संदिप मालसाने, पोशि/११६५ घनश्याम महाले, पोशि/२१२८ विष्णु जाधव, पोशि/२५०७ वैभव परदेशी असे पंचवटी पोलीस ठाणे हददीत गस्त करीत असतांना ते मेरी शासकीय ऑफीस गेट समोर आले असता तेथे त्यांना दोन इसम संशयास्पद रित्या विना नंबर प्लेटची मोटर सायकल घेवुन जातांना दिसले. पोलीस पथकाने त्यांना थांबण्याची विनंती केली असता ते पळुन जावु लागल्याने पोलीस पथकाने त्यांचा पाठलाग करुन त्यांना काही अंतरावर शिताफीने थांबविले. त्यानंतर त्यांना त्यांचे नाव व पत्ता विचारला असता त्यांनी त्यांचे नाव १) यश राकेश मांडवडे, वय १९ वर्ष, राहणार चवगाव, नामपुर रोड, चवगाव पहिला फाटा ता. बागलान (सटाणा) जि. नाशिक २) प्रशांत एकनाथ गावित वय १९ वर्षे रा. बाबापुर पो.स्ट. मावडी ता. दिंडोरी जि. नाशिक असे सांगितले. त्यांना त्यांचे ताब्यातील मोटर सायकल बाबत विचारले असता त्यांनी काहीएक माहिती न देता उडवाउडवीचे उत्तरे दिली तसेच मो/साचे कोणतेही कागदपत्र सादर केले नाहीत. म्हणून त्यांना पंचवटी पोलीस ठाणेस आणून त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता नमूद मो/सा त्यांनी महाराणा बिअर बारच्या उजव्या बाजुस असलेल्या मोकळया जागेत, वक्रतुंड हाईट्स बिल्डींगच्या समोर, दिंडोरी रोड, तारवालानगर, पंचवटी नाशिक येथुन चोरली असल्याचे सांगितले. त्यानूसार पंचवटी पोलीस ठाणे चा अभिलेख तपासला असता नमुद मो/ सा हि गुर.न.५६०/२०२३ भादवि ३७९ मधील असल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर त्यांच्याकडे पोना/१०२ मालसाने यांनी सखोल चौकशी केली असता त्यांनी पंचवटी, म्हसरूळ, भद्रकाली पोलीस ठाणे नाशिक शहर व दिंडोरी पोलीस ठाणे, वणी पोलीस ठाणे नाशिक ग्रामीण येथुन वेगवेगळ्या कपंनीच्या मोटर सायकल चोरी केल्याचे निष्पन्न झाल्याने यश राकेश मांडवडे, वय १९ वर्षे, रा. चवगाव नामपुर रोड, पहिला फाटा ता. बागलाण जि. नाशिक याचे कडुन त्याचे राहते घराजवळून खालील नमुद किमतीच्या मो/ सा हस्तगत करण्यात आल्या आहेत.

 

तसेच पंचवटी पोलीस ठाणे कडील ०२, म्हसरुळ पोलीस ठाणे कडील ०४, भद्रकाली पोलीस ठाणे कडील ०१, दिंडोरी पोलीस ठाणे कडील ०१, वणी पोलीस ठाणे कडील ०१ असे ०९ मो/ सा चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.

 

सदरची कामगिरी श्री. संदिप कर्णिक साो, पोलीस आयुक्त, नाशिक शहर मा. श्री. किरणकुमार चव्हाण, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१, नाशिक शहर, मा. श्री. नितीन जाधव, सहा. पोलीस आयुक्त, पंचवटी विभाग, नाशिक शहर वपोनि/अनिल शिंदे, पोनि/जितेंद्र सपकाळे (गन्हे), पोनि/नदंन बगाडे (प्रशासन) पंचवटी पोलीस ठाणे नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशोध पथकाचे सपोनि रोहित केदार, सपोनि मिथुन परदेशी, सपोउनि काकड, पोहवा/६९२ गुंबाडे, पोहवा /१६९४ नाईक, पोहवा / ३९१ शिंदे, पोहवा/नांदूर्डीकर, पोहवा/४४३ कोरडे, पोहवा / चव्हाण, पोना/२५४ भोईर, पोना/१०२ मालसाने, पोना/६०७ लोणारे, पोना/१४७३/शिंदे, पोशि/११६५ महाले, पोशि/२१२८ जाधव, पोशि/२५०७ परदेशी, पोशि/२१८० खाडेकर, पोशि/२१४४ पवार, पोशि/५३ पचलोरे, पोशि/९९ साबळे अशांनी संयुक्तिक रित्या केली आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्हयाचा पुढील तपास पोहवा/४४३ कोरडे व पोहवा / चव्हाण करीत आहेत. 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!