एकाव ते नवलच : पोलिसांचा खबऱ्याच बनला अमली पदार्थांचा विक्रेता…!
लाल दिवा-नाशिक,ता .१९ : एकेकाळी पोलिसांचा खबऱ्या म्हणून काम करणारा तरुणच आता अमली पदार्थांचा विक्रेता झाली. शनिवारी सिडको पोलिसांनी एका नशेखोराला पकडल्यानंतर ही बाब उघडकीस आली. फिरोज खान जोहर खान (वय २६, रा. हुसेन कॉलनी, गारखेडा) असे त्याचे नाव आहे.
सिडको पोलिस ठाण्याच्या निरीक्षक गीता बागवडे यांनी परिसरात मोकळ्या मैदानावर बसलेल्या टवाळखोरांची धरपकड सुरू केली आहे. शनिवारी एक मुलाकडे नशेच्या दोन गोळ्या आढळल्या. उपनिरीक्षक, अमोल म्हस्के यांनी त्याला पकडून कसून चौकशी केली. त्याला गोळ्या आणून देणाऱ्याचा नंबर त्याच्याकडे आढळला.
What’s your Reaction?
+1
+1
2
+1
+1
+1
+1
+1