महाराष्ट्रात पुन्हा एकदा एनआयएने धाडी टाकल्या आहेत..!
लाल दिवा-नाशिक,ता.१८: अमरावती जिल्ह्यातील अचलपूरमध्ये एनआयएने हे छापे टाकले आहेत. यात काही लोकांना ताब्यात घेतल्याची माहितीही समोर आली असली तरी त्याला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. एटीएस आणि महाराष्ट्र पोलिसांची मदत घेत राज्यातील अनेक ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या आहेत. आयसीस मॉड्यूलसंदर्भात काही दिवसांपूर्वी NIA चं धाडसत्र सुरु होते. त्याचाच एक भाग म्हणून या धाडीकडे पाहिले जात आहे.
दहशतवादविरोधी एजन्सी म्हणजेच एनआयएने आज सकाळी चार राज्यांतील 19 ठिकाणी छापे टाकले. ISIS नेटवर्क प्रकरणात हा छापा टाकण्यात आला. या 19 ठिकाणी कर्नाटकातील 11, झारखंडमधील 4, महाराष्ट्रातील 3 आणि दिल्लीतील 1 ठिकाणांचा समावेश आहे.
गेल्या आठवड्यात NIA ने राज्यात 40 ठिकाणी छापे टाकून 15 जणांना अटक केली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक ISIS मॉड्यूलचा म्होरक्या होता आणि तो या मॉड्यूलमध्ये नवीन लोकांची भरती करत असे, असे तपास संस्थेने सांगितले होते. या धाडीच्या माध्यमातून मिळालेल्या धाग्यादौऱ्यांचा संबंध आजच्या धाडीशी असल्याचे बोलले जात आहे.