मालेगावात हज हाऊस उभारा; मंत्री भुसेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र…!
लाल दिवा-मालेगांव,ता.१४ : मालेगाव तालुक्यात मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात असून याठीकानाहून हज यात्रेसाठी मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात जात असतात त्यांच्यासाठी हज हाऊस बांधण्यासाठी निधी देण्यात यावा अशी मागणी नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व अल्पसंख्याक मंत्री अब्ददुल सत्तार यांना पत्राद्वारे मागणी केली आहे.
मालेगाव शहर व तालुक्यात तसेच नाशिक जिल्ह्यातील इतर तालुके, मालेगांव तालुक्यालगतचा धुळे जिल्हा येथे मुस्लिम बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सद्यस्थितीत हज यात्रकरुंना यात्रेपूर्वी आवश्यक बाबींच्या पुर्ततेसाठी मुंबई येथील हज हाऊस येथे जावे लागते. यात्रेकरूंचा अतिरिक्त वेळ व पैसा खर्च होतो. मालेगांव शहरात हज हाऊस मंजुर झाल्यास मुस्लिम बांधवांना हज यात्रेला जाण्यासाठी याचा फायदा होईल. हज हाऊस बांधणेसाठी आवश्यक शासकीय भूखंड मालेगांव शहरात उपलब्ध असून या जागेवर हज हाऊस उभारावे अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे मागणी केली आहे.
मालेगाव – धुळे येथील मुस्लिम बांधवांना हज यात्रा प्रवासानुषंगिक सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्यासाठी मालेगांव शहरातील सर्व्हे नं. ७८/१/अ या शासकीय भुखंडावर हज हाऊस बांधणेकरिता निधी उपलब्ध करण्यात यावा अशी मागणी मंत्री भुसे यांनी केली आहे.