शहरातील जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस …
लाल दिवा -नाशिक,ता. शहरातील जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस १२: मा. श्री. संदिप कर्णिक साो, पोलीस आयुक्त, नाशिक शहर मा. श्री. किरणकुमार चव्हाण, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१, नाशिक शहर, मा. श्री. नितीन जाधव, सहा. पोलीस आयुक्त, पंचवटी विभाग, नाशिक शहर यांनी नाशिक शहरातील जबरी चोरीचे गुन्हे उघडकिस आणणे बाबत आदेशित केले आहे.
दि. ८ रोजी गुन्हे शोध पथकाचे पो . हवालदार दिपक नाईक, पो . नाईक निलेश भोईर, पो.नाईक संदिप मालसाने, पो.शिपाई विष्णु जाधव, पो शिपाई घनश्याम महाले असे डि.बी. मोबाईलमध्ये रात्रगस्त करीत असतांना डायल ११२ वर एका इसमाने त्याचेकडील मोबाईल व २,५००/- रू०रोख असे अज्ञात आरोपीने बळजबरीने हिसकावुन निलेबाबत कळविले होते. नमुद कॉलला प्रतिसाद म्हणुन डि.बी. पथकाचे वरील कर्मचारी तात्काळ घटना ठिकाणी फिर्यादी यांचेशी संपर्क करून त्यांच्याकडुन संशयीत आरोपीताबाबत माहिती घेवुन प्रभावीपणे रात्रगस्त करतांना सदर प्रकारातील संशयीत आरोपी यास गुन्हयातील मुद्देमालासह ताब्यात घेतले तसेच नमुद रात्री. हद्दीत फिरणारे रेकॉर्डवरील गुन्हेगार व टवाळखोर तपासले असता एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडे स्नॅचिंग केलेला मोबाईल हॅण्डसेट मिळुन आल्याने पंचवटी पोलीस ठाणेकडील गु.र.नं. ५७७/२०२३ भा.द.वि.क. ३९२ वगु.र.नं. ५७८/२०२३ भा.द.वि.क. ३९२ प्रमाणे जबरी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणले.
सदरची कामगिरी मा. श्री. संदीप कर्णिक साो, पोलीस आयुक्त, नाशिक शहर मा.श्री. किरणकुमार चव्हाण, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१, नाशिक शहर, मा. श्री. नितीन जाधव, सहा. पोलीस आयुक्त, पंचवटी विभाग, नाशिक शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अनिल शिंदे, पो निरीक्षक श्री. सपकाळे (गुन्हे), पो निरीक्षक श्री. बगाडे (प्रशासन), पंचवटी पोलीस ठाणे नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशोध पथकाचे सपोनि मिथुन परदेशी, पो . हवालदार दिपक नाईक, पो नाईक निलेश भोईर, पो नाईक संदिप मालसाने, पो.शिपाई विष्णु जाधव, पो.शिपाई घनश्याम महाले अशांनी संयुक्तिक रित्या केलेली आहे.
सदर कामगिरीबाबत श्री. संदिप कर्णिक साो, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात मा.श्री. किरणकुमार चव्हाण, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१, नाशिक शहर, मा. श्री. नितीन जाधव, सहा. पोलीस आयुक्त, पंचवटी विभाग, नाशिक शहर यांचे उपस्थितीत पंचवटी पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार यांना प्रशंसापत्रक देवुन गौरविले आले.