भद्रकाली परिसरातील अवैध व्यवसायाबाबत आ. नितेश राणे यांनी विधानसभेत उठवला आवाज ; नाशिक पोलिसांची नाचक्की..!
लाल दिवा-नाशिक,ता.१३ : गेल्या अनेक वर्षापासून भद्रकाली परिसरामध्ये अवैध व्यवसाय सुरू असल्याच्या चर्चा नेहमी आपण एकत आलो आहोत. याबाबत नेहमी स्थानिक नागरिकांकडून कारवाईची मागणी होत होती.
परंतु पोलिसांचे नेहमी दुर्लक्ष होत होते. दस्तर खुद्द भारतीय जनता पक्षाचे आमदार नितीश राणे यांनी विधानसभेत आवाज उठवून भद्रकाली परिसरातील अवैध धंदे राजरोसपणे सुरू असून तेथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना सांगूनही त्यावर कारवाई होत नसल्याची खंत व्यक्त करत नाशिक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केल्याने एकच खळबळ उडाली आहे. तर स्थानिक आमदारांनी मात्र त्यावर प्रश्न उपस्थित करणे आवश्यक असतानाही श्री. राणे यांनी तो प्रश्न उपस्थित करून स्थानिक विधानसभा आमदारा नेमकं करता तरी काय ?
असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. त्यामुळे नाशिकचे नवनियुक्त पोलीस आयुक्त आता यावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.