संविधानाची नैतिकता वाचविण्यासाठी विधी महाविद्यालयाच्या तरुणांनी हाती घेतली अद्भुत मोहीम…!
लाल दिवा-नाशिक,ता .१२:गंगापूर रोड:आजकाल राजकारणात आपला हित साधून घेण्या करीता पाहिजे तसा नियमांचा वापर केला जात आहे, आणि या सर्व राजनैतिक ओढाताणीत संवैधानिक नैतिकतेची रोज बळी दिली जात आहे, साधारण जनतेला संवैधानिक नैतिकता म्हणजे काय याचेच ज्ञान नसल्याने ती हि गपगुमान सर्व बघत आहे, परंतु या सर्व परिस्थितीला बघून मविप्र विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी संवैधानिक नैतिकता व संविधानाच्या मूल्यांचे रक्षण करण्याचा निर्धार केला आहे,
व यातून जन्म झाला एक महत्त्वाकांक्षी मोहिमेचा, जी नाशिक चा महाविद्यालया मध्ये जाऊन तेथील तरुणांन मध्ये संविधानाची जनजागृती करून त्यांना संवैधानिक मुल्य व नैतिकतेचे महत्त्व पटवून देण्याचे काम करत आहे,
तसेच नवीन मत दारांना मत देण्या आधी आपण ज्याला निवडून देतो आहे ते हात संविधाना चा चांगला वापर करेल का नाही याचा आधी विचार करण्याचे ही आवाहन करीत आहे.
- हि संविधान जनजागृती चि मोहीम आतापर्यंत जे.डी.सी बिटको कॉलेज नाशिक रोड ,
- के. जे. मेहता हायस्कूल अॅण्ड ई. वाय. फडोल जूनीयर कॉलेज.
मविप्र विधी महाविद्यालय अशा विविध ठिकाणी जाऊन, पथनाट्य, गायन, व्याख्यान यांचा माध्यामातून जनजागृती करीत आहे.
या मोहिमेची सुरुवात हर्षद सुनिल पगारे या मविप्र विधी महाविद्यालयात शिकणार्या एका विद्यार्थ्याच्या विचारातून झाली असून पथनाट्या चा संघात सुजाता गरूड, साक्षी झेंडे, जागृती काश्मिरे, संजना जगताप, गायत्री दिवे, नेहा चौधरी, श्रुती नाईक, प्रतीक कुकडे, राहुल गवळी, अनुजा बांग, हर्षद पगारे चा समावेश आहे.
दिनांक 11 डिसेंबर ला हि मोहीम मविप्र विधी महाविद्यालया कडे वळली या वेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून के.के वाघ महाविद्यालय, पिंपळ गाव बसवंत चे प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे उपस्थित होते, तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून म. वि.प्र. समाज विधी महाविद्यालयाच्या महाविद्यालय विकास समिती चे अध्यक्ष ॲड. भास्कर राव चौरे सर यांनी हि आपली उपस्थिती दर्शवली, या वेळी कार्यक्रमाला अतिथी म्हणून के. टी.एच.एम.महाविद्यालयाचे प्राध्यापक व रा. से. यो नाशिक जिल्ह्यातील विभाग समन्वयक डॉ. गोरक्षनाथ पिंगळे हे देखील लाभले,
- युवकांना अशा आणखी उपक्रमांसाठी प्रोत्साहन देण्यासाठी महाविद्यालयाच्या च्या प्राचार्या डॉ. संध्या गडाख आणि राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. जान्हवी झांजे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करीत आपली उपस्थितीती नोंदवून मुलांचे कौतुक केले.
या वेळी कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख अतिथी डॉ. ज्ञानोबा ढगे यांनी राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या महाविद्यालयात जाऊन जो संविधान जनजागृती चा उपक्रम राबविला त्याचे कौतुक करीत त्यांनी स्वातंत्र्याची ७५ वर्ष पूर्ण होऊनही आजही समाजाला संविधानातील मूलभूत हक्क आणि नीतिमूल्ये यांचे भान राहत नाही, समाज वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती करून हि उदासीन कसा आहे व नीतिमूल्ये नियमित न पाळल्या मुळे समाज व्यवस्थेत येणार्या अडचणी व समाजकारणात, राजकारणात व अर्थव्यवस्थेला निर्माण होणारे धोके यावर भाष्य केले, तसेच समाजात जाऊन म.वि.प्र. विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जी संविधान जनजागृती करण्याचा पुढाकार घेतला त्याचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले अँड. भास्करराव चोरे सर यांनी देखील मविप्र समाज विधी महाविद्यालयाच्या रा. से. यो. विभागा अंतर्गत घेण्यात येणार्या वेगवेगळ्या उपक्रमांना पाठींबा देत अजून विद्यार्थ्यांन समजा पर्यंत पोहोचले पाहिजे Legal Aid unit द्वारे गावाचा, पाड्यांवर जाऊन कायदेविषयक प्रबोधन केले पाहिजे असे सांगून मुलांचे कौतुक केले