नाशिककर गणपतींना मिळू शकते बक्षीस!

१० गणेश मंडळांना मिळणार आकर्षक बक्षिसे, ऑनलाईन नोंदणी सुरू

लाल दिवा-नाशिक – (दि. ०३/०९/२०२४) यंदाचा गणेशोत्सव नाशिककरांसाठी आणखी खास ठरणार आहे! सन २०२४ च्या सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना शिस्त आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या मंडळांना नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाकडून आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.

दि. ०७/०९/२०२४ ते १७/०९/२०२४या कालावधीत होणाऱ्या गणेशोत्सवात स्थानिक पोलीसांकडून परवानगी घेतलेल्या आणि  उत्कृष्ट कामगिरी  करणाऱ्या मंडळांना ही बक्षिसे देण्यात येणार आहेत. पर्यावरणपूरक गणेशमुर्ती, ध्वनीप्रदूषण नियंत्रण, सामाजिक उपक्रम, वाहतूक नियम पालन अशा विविध निकषांवर आधारित १५० गुणांच्या आधारे ही निवड केली जाणार आहे.

नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ-१ आणि परिमंडळ-२ या दोन्ही विभागांमध्ये स्वतंत्रपणे बक्षिसे दिली जातील. प्रत्येक विभागात प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकांची बक्षिसे  देण्यात येतीलच, शिवाय दोन उत्तेजनार्थ बक्षिसेही देण्यात येतील. अशाप्रकारे एकूण १० गणेश मंडळांना ही बक्षिसे मिळणार आहेत.

पोलीस आयुक्त कर्णिक यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत अधिकाऱ्यांना व नाशिक शहरातील गणेश मंडळांना खबरदारी आणि उपाय योजनांबद्दल मार्गदर्शनपर सूचना केल्या.

<https://forms.gle/BzAZReEuRla8KQfo6>

सदर बक्षीस योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक गणेश मंडळांनी <https://forms.gle/BzAZReEuRla8KQfo6>या लिंकवर जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातर्फे करण्यात आले आहे..

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!