नुतन पोलीस आयुक्तांचा पाहिल्या आठवडयात चौकार….!
लाल दिवा-नाशिक,७ : पोलीस आयुक्तालय हह्यीत नागरिकांची लुटमार, मारहाण व दहशत निर्माण करुन जनजीवन विस्कळीत करणा-या मुंबई नाका येथील गुंडावर एम.पी.डी.ए. कायदयान्वये स्थानबध्दतेची कारवाई.
मुंबईनाका पोलीस ठाणे हद्यीत यश राजेंद्र शिंदे, वय-२४ वर्षे, रा. नागसेनवाडी, वडाळानाका, नाशिक. सध्या रा. फ्लॅट नं. बी-८, शिवदर्शन अपार्टमेंट, चर्च च्या मागे, पाथर्डी रोड, इंदिरानगर, नाशिक याने त्याची वडाळानाका, उपनगर, नागसेनवाडी, मुंबईनाका, इंदिरानगर आणि नजीकच्या परिसरात दहशत कायम रहावी यासाठी त्याने सर्वसामान्य नागरिकांना शस्त्रांचा धाक दाखवुन लुटमार व मारहाण करुन लोकांच्या मनात भिती आणि दहशतीचे वातावरण निर्माण केले होते. त्याचेवर दिनांक १९/१०/२०२१ रोजी सिआरपीसी. ११० (ई) (ग) प्रमाणे प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. नाशिक शहर व नाशिक ग्रामिण जिल्हयातुन एक वर्षासाठी हद्दपार करण्याची कारवाई सुरु असतांना देखील त्याने गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहे.
यश राजेंद्र शिंदे याचेवर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करुनही त्याने गुन्हेगारी कृत्य चालु ठेवुन जनजिवन विस्कळीत केल्याने मा. पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक यांनी त्यास मध्यवर्ती कारागृह, नाशिकरोड येथे एम.पी. डी.ए. कायदा सन १९८१ चे कमल ३ (२) अन्वये स्थानबध्द करणे बाबतचे आदेश दिनांक ०६/१२/२०२३ रोजी जारी केले आहे. सन २०२३ मध्ये आतापावेतो स्थानबध्दतेची ही १४ वी कारवाई आहे.
यश राजेंद्र शिंदे याचेविरुध्द उपनगर, मुंबईनाका, सरकारवाडा, गंगापुर व पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल आहेत जसे घातक शस्त्राने इच्छापुर्वक दुखापत पोहचवणे, मनाई आदेशाचे उल्लंघन करणे, खुनाचा प्रयत्न, इच्छापुर्वक दुखापत पोहचवणे, बेकायदेशीर जमावाचा घटक असणे, दंगा करणे, शांतताभंग घडवुन आणण्याच्या उद्देशाने अपमान करणे, फौजदारीपात्र धाकदपटशा, घातक हत्यारांनी किंवा साधनांनी इच्छापुर्वक जबर दुखापत पोहचवणे, गैरनिरोध करणे, प्राण घातक हत्यारांसह सज्ज होवुन बेकायदेशीर जमावात सामील होणे, प्राण घातक हत्यारांसह सज्ज होवुन दंगा करणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, नुकसान करुन आगळीक करणे, घर इत्यादी नष्ट करण्याच्या उद्देशाने किंवा स्फोटक पदार्थ याब्दारे आगळीक करणे, दुखापत करण्याची पूर्व तयारी करुन गृह अतिक्रमण करणे, विनापरवाना अवैध शस्त्र व अग्नीशस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
मा. पोलीस आयुक्त, श्री. संदिप कर्णिक यांनी नमुद इसमाने नाशिक शहरात सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण होईल असे गुन्हेगारी कृत्य व गुन्हे करून जनजीवन विस्कळीत केल्याने नाशिक शहरातील सार्वजनिक सुव्यवस्था आबाधीत राहावी त्यासाठी एम.पी.डी.ए. कायदयान्वये स्थानबध्दतेची प्रतिबंधक कारवाई केल्यामुळे नाशिक शहरातील नागरिकांनी सदर कारवाई बाबत समाधान व्यक्त केले आहे.
- तसेच यापुर्वी गुन्हेगारी कृत्य व गुन्हे करुन जनजीवन विस्कळीत करणारे इसमांवर सन २०२१ मध्ये ०९, सन २०२२ मध्ये ०२ तर सन २०२३ मध्ये आजपावेतो चालु वर्षात १४ गुन्हेगारांवर एम.पी.डी.ए. कायदयान्वये कारवाई करण्यात आलेली असुन यापुढे देखील नाशिक शहरातील जनजीवन विस्कळीत करणा-या व समाज स्वास्थ बिघडविणा-या इसमांवर एम. पी.डी.ए. कायदयाच्या तरतुदीनुसार प्रभावीपणे प्रतिबंधक कारवाई करण्याची प्रकिया सुरु राहणार आहे.