“लव्ह जिहाद”च्या नावाखाली हिंदू मुलीना फसवून….. लैंगिक अत्याचाराची घटना येवल्यातील तरुणीबाबत घडताच ….सकल हिंदू समाजातर्फे बंद पाळून तहसील कार्यालयावर काढण्यात आला भव्य दिव्य……हिंदू जनआक्रोश मोर्चा….!

लाल दिवा-नाशिक,येवला, ता. ४ : ‘लव्ह जिहादविरोधी कायदा झालाच पाहिजे’, ‘प्यार नहीं ये धोका हैं, सुधर जाओ दीदी’, ‘अभी भी मौका है, हिंदू बेटीया हिंदू बनो’, ‘लव्ह जिहाद को पहचानो’, ‘जिहाद्यांना फाशी झालीच पाहिजे’, ‘हिंदू मुलींनो जागे व्हा, त्याच्यातील राक्षस ओळखा’, ‘विशेष न्यायालयात फास्ट ट्रॅक खटला चालून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी’ आदी फलक हाती घेऊन हजारोच्या संख्येने जमलेल्या हिंदुत्ववादी तरुणांनी जोरदार घोषणाबाजी करत शहरातून तहसील कार्यालयावर हिंदू जनआक्रोश मोर्चा काढला. त्यानंतर झालेल्या सभेत लव्ह जिहाद्यांना फाशी झालीच पाहिजे, अशी आक्रमक मागणी करण्यात आली.

 

लव्ह जिहादच्या नावाखाली हिंदू मुलीना फसवून लैंगिक अत्याचाराची घटना शहरातील तरुणीबाबत

 

घडल्यानंतर सकल हिंदू समाजातर्फे सोमवारी (ता. ४) शहर बंद पाळून तहसील कार्यालयावर हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. येथील एका तरुणीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली असून, आरोपींवरचा खटला जलदगती न्यायालयात चालवून फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. विशेष म्हणजे मोर्चात हजारोंच्या संख्येने हिंदुत्ववादी संघटनांचे नागरिक, महिला आणि

 

तरुण-तरुणींचाही समावेश होता. येथील विंचूर चौफुलीवरील अटलबिहारी वाजपेयी चौकातून मोर्चाला सुरवात होऊन शहराच्या प्रमुख मार्गावरून मोर्चा पुढे गेला. तरुण-तरुणींनी हातात विविध घोषणांचे फलक घेतले होते. हजारोच्या संख्येने निघालेल्या या मोचनि संपूर्ण शहराचे लक्ष वेधले. स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या प्रांगणात मोर्चाचे सभेत

 

रूपांतर झाले. मुलींच्या हस्ते दोषींवर कारवाईच्या मागणीचे निवेदन नायव तहसीलदार पंकज मगर यांना देण्यात आले. शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यांना हार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली. संभाजीनगर येथील हिंदुत्ववादी कार्यकर्त्या हर्षदा ठाकूर यांनी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या,’ आपला धर्म सोडून कुठल्या जिहादींच्या नादी लागाल तर सात तुकड्यांमध्ये वाटले जाल. चार दिवस जगा, पण हिंदू म्हणून जगा. आमच्या हिंदू धर्मात कुणी फूट पाडण्याचा प्रयत्न करत असेल, तर ते आम्ही सहन करणार नाहीं. लव्ह जिहादला बळी पडू नका, असे त्यांनी सांगितले.

 

छेडछाडीला प्रतिकार करा नाशिक येथील सनातन संस्थेच्या राजश्री देशपांडे यांनी हिंदू धर्मातील

 

माता भगिनींकडे कुणी वाकड्या नजरेने बघता कामा नये, अशी दहशत ठेवा, लव्ह जिहादच्या माध्यमातून संपूर्ण जगावर राज्य करण्याचे षडयंत्र सुरू असून, त्या जाळ्यात अडकू नका. लव्ह जिहाद नावाचे संकट आज आपल्या देशासमोर उभं ठाकले आहे. त्यामुळे मुलींनो जागृत राहा. ज्या ज्या वेळेस धर्माध तुमची छेड काढतील, त्याचा विविध माध्यमांतून प्रतिकार करा. मिळेल त्या शस्वाने त्यांचा प्रतिकार करा, स्वतःचे संरक्षण करणे हा कायद्याने आपल्याला दिलेला अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

… अन्यथा तुमचे भवितव्य अंधकारमय संग्राम महाराज भंडारे (पुणे) यांनी आज प्रतिकार केला नाही, तर तुमचे भविष्य अवघड असल्याचे सांगत हिंदू मुलीवर अत्याचार होत असताना विरोध केला जात असेल, तर धार्मिक वळण देऊ नका, असे कोणी म्हणत असेल तर हिंदू समाज हे

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!