पोलीस आयुक्ताकडुन सार्वजनिक शांतता भंग करणा-यांवर करडी नजर…… कोंबीग – ऑल-आउट ऑपरेशन राबवुन……..टवाळखोरांवर धडक कारवाई…..!

लाल दिवा-नाशिक,ता.२९ : मा.श्री. संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी शहरातील शरीराविरूध्द गुन्हे करणारे सराईत गुन्हेगार तसेच समाजस्वास्थ्य बिघडवणारे टवाळखोर इसम व सार्वजनिक ठिकाणी मदयपान करून सार्वजनिक शांतता बिघडवणारे इसमांवर कारवाई करणेसाठी कोंबीग -ऑल-आउट ऑपरेशन राबविणेबाबत आदेशीत केले होते.

 

त्यानुसार मा. श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, मा. श्री किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त, परिमंडळ-१, मा. श्रीमती मोनिका राऊत, पोलीस उपायुक्त परिमंडळ-२, मा.श्री चंद्रकांत खांडवी, पोलीस उपायुक्त (मुख्यालय), यांचे मार्गदर्शखाली सर्व विभागीय सहा. पोलीस आयुक्त, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) व सर्व पोलीस ठाणे/शाखा प्रभारी अधिकारी यांनी दिनांक २८/११/२०२३ रोजीचे १९.०० ते २२.०० वाजेपावेतो सर्व पोलीस ठाणे हद्दीत कोबींग / ऑल-आउट ऑपरेशन राबवुन टवाळखोर इसमांवर कारवाई करण्यात आली.

 

कॉम्बींग/ऑल-आउट ऑपरेशन दरम्यान परिमंडळ-१ हददीमधील आडगाव, पंचवटी, म्हसरूळ, भद्रकाली, सरकारवाडा, मुंबईनाका, गंगापुर या पोलीस ठाणे हददीमधील ३१७ टवाळखोर इसमांना ताब्यात घेवुन त्यांचेवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११२/११७ प्रमाणे कारवाई करण्यात आली तसेच सी.आर.पी.सी. कलम १५१ (१) अन्वये ३ व कोटपा कायदयान्वये ३० इसमांवर कारवाई करण्यात आली. तसेच परिमंडळ-२ हददीमधील सातपुर, अंबड, इंदिरानगर, उपनगर, नाशिकरोड, देवळाली कॅम्प या पोलीस ठाणे हददीमधील २४८ टवाळखोर इसमांना ताब्यात घेवुन त्यांचेवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११२/११७ प्रमाणे कारवाई करण्यात आली तसेच कोटपा कायदयान्वये ०५ इसमांवर कारवाई करण्यात आली.

कोंबीग/ऑल-आउट ऑपरेशन दरम्यान शहरातील एकुण ५६५ इसमांवर मपोका. कलम ११२/११७ कायदयान्वये तसेच ३५ इसमांवर कोटपा कायदयान्वये व ३ इसमांवर सी.आर.पी.सी. १५१(१) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. यापुढेही पोलीस आयुक्तालय हद्दीत वेळोवेळी कोम्बींग /ऑल-आउट ऑपरेशन राबवून टवाळखोर व शांतता भंग करून समाजस्वास्थ्य बिघडवणारे इसम तसेच सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

सदर कारवाई मा. पोलीस आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली ४ पोलीस उप आयुक्त, ७ सहा. पोलीस आयुक्त, सर्व पोलीस ठाणे/शाखा प्रभारी यांचेसह पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार तसेच गुन्हेशाखेकडील सर्व युनिटचे अधिकारी व पोलीस अंमलदार अशांनी कोबींग/ऑल-आउट ऑपरेशन राबविणेकामी सहभागी होवुन कारवाई केली. आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!