हॉटेलवर अतिक्रमण करवाई करू नये म्हणून वनपरिमंडळ व वनरक्षक यांना लाच स्वीकारताना अटक…!
लाल दिवा-नाशिक ,२१: लाचेचा यशस्वी सापळा कारवाई आरोपी लोकसेवक शैलेंद्र आनंद झुटे, वय- ४८ वर्षे, व्यवसाय-नोकरी, वनपरिमंडळ अधिकारी , सातपुर वनविभाग , सातपुर नाशिक पद-वर्ग 3,आरोपी लोकसेवक 2) श्री साहेबराव बाजीराव महाजन, वय ५४ वर्षे, व्यवसाय-नोकरी, वनरक्षक सातपुर वनविभाग सातपुर नाशिक, पद वर्ग-३लाचेची मागणी एक लाख रुपये व नंतर
साठ हजार रूपये व तडजोडी अंती तीस रु घेण्याचे मान्य केले २१/११/२०२३लाच स्वीकारली तीस हजार पैकी वीस हजार रू दि. २१/११/२०२३ रोजी स्वीकारले
लाचेचे कारण यातील तक्रारदार यांची हॉटेल हयात दरबार ही वनविभागाच्या मालकीचे जागेवर अतिक्रमण करून अवैधरित्या बांधकाम करून व्यवसाय करत आहे असे सांगून यातील आलोसे यांनी तुम्ही मागील दहा वर्षापासून या जागेवर अतिक्रमण केले आहे व पुढील अजून दहा वर्ष कारवाई होऊ नये असे वाटत असेल तर सुरवातीला एक लाख रुपये व त्यानंतर तडजोडी अंती 60 हजार रुपये मागणी केली, तसेच तक्रारदार यांचेविरुध्द कारवाई न करण्यासाठी अंतिमतः तडजोडी अंती तीस हजार रुपये घेण्याचे मान्य करून, तीस हजार रुपयांपैकी वीस हजार रुपये घेताना आज रोजी रंगेहात पकडण्यात आले आहे. त्यांचेवर सातपूर पोलीस स्टेशन नाशिक शहर येथे गुन्हा दाखल करण्याची कारवाई चालू आहे.